Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रPolitics : ...म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी...

Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या बाबा आढाव यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी जिंकलेले आणि हरलेले नेते बाबा आढाव यांच्या भेटीला का येतायत? याचे कारण सांगितलं.

पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आल्यापासून विरोधकांनी एकच मुद्दा लावून धरला आहे, तो म्हणजे ‘ईव्हीएम’. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहे. त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी त्यांना भेट देत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिंकलेले आणि हरलेले नेते बाबा आढाव यांच्या भेटीला का येतायत? याचे कारण सांगितलं. (Uddhav Thackeray criticizes Mahayuti after meeting Baba Adhav)

माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी दुसऱ्यांना फुले वाड्यात आलो आहे. पहिले कधी आलो हे लक्षात नाही, पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील. कारण तुम्ही म्हातारपण स्वीकारणास तयार नाही. माझ्या आधी अजित पवारांचा ताफा येऊन गेला. या ठिकाणी जिंकलेले सुद्धा येत आहेत आणि हरलेले सुद्धा येत आहेत. कारण त्यांना जिंकलो असल्याचा विश्वासच नाही. निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला आहे. पण आता ठिणगी पडली आहे. खरं तर जिंकलेले सुद्धा येतातय आणि हरलेले सुद्धा येतायत याला कारण ईव्हीएम आहे. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे. आरटीआयच्या माध्यमातून आपण जशी माहिती मागवतो, तसं माझं मत कुठे जातंय याची माहिती पण मिळाली पाहिजे. फेरमतमोजणी करताना व्हीव्हीपॅटच्या रिसीट मोजल्या का जात नाही? असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Baba Adhav : तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन; ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढावांनी सोडले उपोषण

बाबा आढाव यांचं आंदोलन मविआने राज्यभर नेलं पाहिजे

दरम्यान, बाबा आढाव यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणीतरी काही तरी चुकीचं करतंय हे सांगणारे कोणी तरी पाहिजे. बाबा आढाव यांना एक विनंती आहे की, आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश एकट्या व्यक्तीचा नाही, तर देशाचा आहे. बाबांसारख्या अनुभवी व्यक्तीलासुद्धा जे घडलंय ते पटत नाही. असं कधीच घडलं नाही असं जेव्हा हा माणूस सांगतो. तेव्हा आपण पुढे जाणार की नाही. हम सब एक है, देशभर दिसलं पाहिजे. बाबा आढाव यांचं आंदोलन जनतेसाठी आहे. त्यामुळे महााविकास आघाडीकडून हे आंदोलन राज्यभर नेलं पाहिजे. ज्यांना वाटतं गडबड झालीय, ते सोबत येतील. जेव्हा जनआंदोलन होईल तेव्हा महात्मा फुलेंचं सत्यमेव जयते होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -