Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'आव आणणारे काही, डोळे वटारल्यावर पळून गेले' उद्धव ठाकरेंची शिंदे आणि अजित पवारांवर टीका

‘आव आणणारे काही, डोळे वटारल्यावर पळून गेले’ उद्धव ठाकरेंची शिंदे आणि अजित पवारांवर टीका

Subscribe

मुंबई : ‘आव आणणारे काही, डोळे वटारल्यावर पडून गेले आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. आज ‘मातोश्री’मध्ये पक्षप्रवेशादरम्यान उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटा प्रवेश केला आहे. यावेळी पेण, सुधागड, रोहा विधानसभा मदारसंघातील पदाधिका आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसैनिकांचे मी मातोश्रीमध्ये स्वागत आहे. मला एका गोष्टीचे नक्की समाधान आणि अभिमान आहे. आज पक्ष प्रवेश केलेला आहात. तुम्ही लढवय्यांच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहात. अन्यायविरूद्ध लढणाऱ्यांच्या सेनेत प्रवेश केलेला आहे. काही जण आपण बघितले की, आव मोठा होता. पण जरा डोळे वटारल्यावर पळून गेले. तुम्ही पळपुटे नाही आहात, याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावरती वार करणे, ही आपली ख्याती आहे. अन्याय सहकरायचा नाही आणि अन्याय कराचा नाही. पण कोणी अन्याय केला, तर अन्याय करणाऱ्याला जागेवर ठेवायचे नाही. ही आपली ओळख आहे. तुमची लढाई ही सगळ्यांच माहिती आहे.”

- Advertisement -

 

हेही वाचा – “महाराष्ट्रातील राजकारणात कबड्डी सुरू”, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर निशाणा

लढवय्यांच्या सेनेत आलात

- Advertisement -

शिशिर धारकर पक्षप्रवेशासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले “वॉशिंगमध्ये तुम्ही जाऊ शकला असता. पण तुम्ही त्यातले नाही आहात. कर नाही तर त्याला डर कशाला. म्हणून वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. आता सर्व लढवय्ये शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत. मला आता खात्री आहे की, गते म्हणाले आता नुसता पेणच नाही, तर चांदा ते बांदापर्यंत आपल्याला बदल घडवायचा आहे. आपल्याला शहान पणाची सत्ता आणण्याची आहे. लोकांना मुर्ख बनविण्याचा उद्योग चालू आहे. तो जास्त काळ चालणार नाही. मी आता पेढला येऊन जाहीर सभेत बोलेण”, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हेही वाचा – राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

भगवा हातातून सुटू देऊ नका

उद्धव ठाकरेंनी उन्हाळ्यामुळे सभा थांबविल्या होत्या. येत्या 27 तारखेला हिंगोलीला सभा घेणार आहे. पेणमध्ये कधी सभा घेईची हे तुम्ही ठरवा, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. “तुम्ही जो भगवा हातात धरलेला आहात. तो मात्र कोणी कितीही प्रयत्न केला. हातातून सुटू देऊ नका. भगवा तुमच्या हातातून सुटणार नाही, अशी अपेक्षा करतो”, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केला आहे.

- Advertisment -