घरमहाराष्ट्रपाऊसही म्हणतोय मी पुन्हा येईन ...

पाऊसही म्हणतोय मी पुन्हा येईन …

Subscribe

उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला

पाऊसही मी पुन्हा येईन, असे म्हणतोय, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. उद्धव ठाकरेंनी रविवारी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ‘मी पुन्हा येईन’ ही कविता सादर केली होती. त्यानंतरच्या अनेक सभांमध्येही फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’असे सांगत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही आहे. पाऊस जाताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे म्हणत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे

राज्यातील सत्तेचा तिढा केव्हा सुटेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असला उद्धव ठाकरे यांनी त्यावर कोणतेही वक्तव्य केले नाही. शेतकर्‍याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण सत्ता स्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मला शेतीतले फारसं कळत नाही. पण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी आहे. शेतकर्‍यांना तातडीनं हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या. यातून तो पुढच्या हंगामाची तयारी करू शकेल. शेतकर्‍यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा फारसा विचार करू नका. बळीराजाला माणुसकीच्या नात्यानं मदत करा आणि मग निकषांच्या फुटपट्ट्या लावा. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनानं कागदी घोडे नाचवू नयेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -