वनरक्षक स्वाती ढुमणेंच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत तर पतीला नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

uddhav thackeray decision 15 lakh assistance to Swati Dhumane female ranger killed maya tigress
वनरक्षक स्वाती ढुमणेंच्या कुटुंबीयांना १५ लाखांची मदत तर पतीला नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. स्वाती ढुमणे यांच्यावर वाघिणीने हल्ला केला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून कुटुंबीयांना मदत निधीची घोषणा केली आहे. तसेच एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

वनरक्षक स्वाती ढुमणे या कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर वाघिणीने हल्ला केला. स्वाती ढुमणे शनिवारी प्राण्यांच्या पाऊलखुणा नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. प्रकल्पाच्या कोलार गेटपासून ४ किमी आत चालत गेल्यावर ढुमणे यांना जवळपास २०० मीटरवर एक वाघीण बसली असल्याचे दिसले. वाघीण जाण्यासाठी ढुमणे यांनी जवळपास अर्धा तास वाट पाहिली. त्यांनी तिथून जाण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने वाघिणीने हल्ला केला आणि यामध्ये स्वाती धुमणे यांचा मृत्यू झाला आहे. स्वाती ढुमणे यांच्या हल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; २४ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता