घरमहाराष्ट्रपंतप्रधानांनी सीमावादावर बोलावं; उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

पंतप्रधानांनी सीमावादावर बोलावं; उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

Subscribe

कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली तरी काहीही फरक पडणार नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. तसेत कर्नाटकाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ही मजोरी कशासाठी सुरु आहे. याला कोणाचे पाठबळ आहे. आपल्याच नेत्याविरोधात बोलायचे, हे कोठे तरी थांबायला हवे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक सीमावादावर आधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

औरंगाबाद: समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे. तुम्ही आमचे पालक आहात. पालक असल्यासारखं बोला. आम्ही पालकची भाजी असल्यासारखं बोलू नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.

मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारी सुरु झाले. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली तरी काहीही फरक पडणार नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. तसेत कर्नाटकाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ही मजोरी कशासाठी सुरु आहे. याला कोणाचे पाठबळ आहे. आपल्याच नेत्याविरोधात बोलायचे, हे कोठे तरी थांबायला हवे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक सीमावादावर आधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, कर्नाटक सीमेच्या मुद्द्यासाठी बाळासाहेब तीन महिने तुरुंगात होते. त्यांची भूमिका स्पष्ट होती. बाळासाहेबांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आहे. त्यांचे नाव असलेल्या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. त्यावेळी भाषण करताना राज्यपाल्यांच्या वक्तव्यावर पांघरुण घातले जाईल. आमच्यावर टीका केली जाईल. आमची कानउघडणी केली जाईल. तुम्ही आमचे पालक आहात. तुम्हाला तो अधिकार आहे. त्यामुळे पालकासारख बोला. आम्ही पालकची भाजी आहोत, असे बोलू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार

- Advertisement -

फलुे, आंबेडकर व कर्मवीरांनी शाळा काढण्यासाठी भिक मागितली होती, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. याचाही समाचार ठाकरे यांनी घेतला. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असे बोलत असतील तर काय उपयोग. तुमच्या भिकेची आम्हाला गरज नाही. अशी वक्तव्य करता मग शिक्षण कशाला देता. तुम्ही भिक देणारे कोण, असे खडेबोल ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले.

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

एक मंत्री महिलेविरोधात चुकीचे शब्द बोलतो व त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. त्या मंत्र्याचे शब्द ऐकवत नाहीत. तरीही त्याचा राजीनामा घेतला जात नाही. माझ्या मंत्रिमंडळातही असाच एक होता, महिलांचा अपमान करणारा. त्याला तत्काळ काढून टाकले होते, अशी आठवण ठाकरे यांनी आमदार संजय राठोड यांचे नाव न घेता करून दिली. तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यानी सत्तार यांचे नाव न घेता केली.

आताचे रेडे खोके खोके ओरडतात

ज्ञानेश्वरांच्या काळात रेड्याने वेद म्हटले होते. मात्र आताचे रेडे खोके खोके ओरडतात, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.

गांधीजींची आठवण

भाषणाची सांगता करताना उद्धव ठाकरे यांनी वंदे मातरम् व चले जावची आठवण करुन दिली. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरमचा नारा दिला तर गांधीजींनी इंग्रजांनी चले जाव, असे म्हटले होते. तशीच वेळ आता आली आहे, असे उद्धव यांंनी सांगितले. लोकशाही आहे की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच न्यायपालिकेतही सरकारला हस्तक्षेप हवा आहे. मग न्यायपालिका हवी तरी कशाला, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -