घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : स्वप्नातले पालकमंत्री जॅकेट शिवून थकले पण...; उद्धव यांचा गोगावलेंना...

Uddhav Thackeray : स्वप्नातले पालकमंत्री जॅकेट शिवून थकले पण…; उद्धव यांचा गोगावलेंना चिमटा

Subscribe

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जनसंवाद नाही करत आहे. मी माझ्या कुटुंबाशी संवाद करतोय. हा माझा परिवार आहे, हा माझा कुटुंब आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती.

पोलादपूर (रायगड) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालपासून रायगड दौऱ्यावर आहेत. आज 2 फेब्रुवारी रोजी पोलादपूरमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यावर टीका केली. यावेळी स्वप्नातले पालकमंत्री जॅकेट शिवून थकले पण, अजून मंत्रीपद मिळाले नसल्याचे म्हणत त्यांनी गोगावलेंना चिमटा काढला. (Uddhav Thackeray Dream guardian minister tired of sewing jacket but Uddhav critisis Gogavale)

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही माझी जनसंवाद यात्रा नसून, माझ्या कुटुंबाशी संवाद करतोय. हा माझा परिवार आहे, हे माझे कुटुंब आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबीयांसाठी केली होती. आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे. कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक सदस्य मानतो. हे केवढं मोठं माझं भाग्य आहे. आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात हड, सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर लोक म्हणतात जा तुझ्या घरी.

- Advertisement -

मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की, रायगडाचं वारं फिरलं, रायगडाचं वार असं फिरणार नाही. रायगडाच्या वाऱ्यांनी मोठमोठी सरकार फिरवून टाकलेत. उलथापालथ करून टाकलेली आहेत. दिल्ली, आगऱ्याला झुकवणारा हा रायगड आहे. ही नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे. संतांची वीरांची, संतांची आणि वीरांची ही भूमी आहे. या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंढाण्याचं, जीव गेला तरी बेहत्तर पण, मी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही, भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच अशा तानाजी मालुसरेंची भूमी आणि त्याच भूमीमध्ये आता झेंडा राहिला बाजूला आणि नॅपकीन फडकवणारे खूप झाले. बरं दुर्दैव असं, आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, नवीन नवीन जॅकेट शिवली, ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकीन घेतले, ते घामाने भिजले. पण मंत्रिपद काय मिळतंच नाही. आता काय करायचं त्यांच्यासाठी? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंना चिमट काढला.

हेही वाचा : Poonam Pandey Passed Away: काय आहे सर्व्हायकल कँसर? सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सांगितला उपाय

- Advertisement -

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पण त्यांना (भरत गोगावले) माहिती नाही की, ही जी भूमी आहे, ती गद्दारांची भूमी नाही, या रायगडचं वैशिष्ट्य असं आहे की, जिथे थरवीर जन्माला आले. निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये, गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय असं उपस्थितांनी घोषणा देताच उद्धव ठाकरे म्हणाले की, डोकं कुठेय त्यांना? म्हणून तर गद्दारी केली. त्यांचं काहीही वर केलं तरी डोकं कुठे आहे? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यावर हल्लोबोल केला.

हेही वाचा : Raj Thackeray: मविआत जाणार का? राज ठाकरे म्हणाले, लवंडे कुठे लवंडतील माहिती नाही…

रायगडमधून आपलाच खासदार निवडून येणार

येथे मोठ्या संख्येने वारकरी जमले आहेत. आम्ही सुद्धा वारकरी आहोत. पण आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. त्यामुळे आपला पंथ एकच आहे. धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे. पताका एकच आहे. जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदूंचा आहे. त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. मला आनंद आहे की, मी हा परिवार संवाद दौरा सुरू केलाय. कुटुंब संवाद दौरा सुरू केला. त्याच्यामुळे मला कुटुंबातली लोकं भेटतायत. आणि खात्री देत आहेत की, यावेळी रायगडमधून सुद्धा आपलाच खासदार येणार, आणि तो आणलाच पाहिजे. असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -