महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ‘हे’ तीन दिवस होणार सलग सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागील काही महिन्यांपासून सातत्याने सुनावणी होत असून, निकाल प्रलंबित ठेवला जात आहे. नुकताच निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर करत शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर सर्वांचेचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लागले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागील काही महिन्यांपासून सातत्याने सुनावणी होत असून, निकाल प्रलंबित ठेवला जात आहे. नुकताच निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर करत शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर सर्वांचेचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लागले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court verdict Hearing controversy)

21 फेब्रुवारीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. ही सुनावणी सलग तीन दिवस म्हणजेच 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी चालणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय देखील शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका आणि अन्य याचिकांवर लवकरच निर्णय देण्याची तयारी करत आहे.

शिंदे गटाने या याचिकांवर कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा हवाला यासाठी देण्यात येणार आहे. तो न्यायालयाने मान्य केल्यास शिंदे गटाच्या बाजुने निकाल लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. यासाठी शनिवारी ठाकरे गटाचे नेते आणि कायदेतज्ज्ञांची मातोश्रीवर बैठक पार पडली. त्यामुळे आता या सुनावणीवेळी नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल निवडणूक आयुक्तांना दलाल असे म्हटले होते. न्यायालयात न्याय होईल असेही ते म्हणाले होते. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस युक्तीवाद झाला होता. यामध्ये ठाकरे गट सात जजच्या बेंचसमोर प्रकरण न्यावे यासाठी आग्रही होता. तर शिंदे गट अरुणाचलच्या प्रकरणाचा हवाला देत होता. परंतू सरन्यायाधीशांनी दोन्ही मागण्या धुडकावून लावत रेबिया प्रकरण बाजुला ठेवून हे प्रकरण पाच जजचे खंडपीठच हाताळेल असे म्हटले होते.


हेही वाचा – “बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शरद पवारांच्या चरणी ठेवला होता”, अमित शाहांकडून खरपूस समाचार