Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : ज्यांना पक्ष सोडायचा असेल त्यांनी खुशाल सोडावा! ठाकरेंची भूमिका

Uddhav Thackeray : ज्यांना पक्ष सोडायचा असेल त्यांनी खुशाल सोडावा! ठाकरेंची भूमिका

Subscribe

महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी नगरसेवक, पदाधिकारी बाहेर पडत असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे.

मुंबई (प्रेमानंद बचाव) : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी नगरसेवक, पदाधिकारी बाहेर पडत असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पक्ष अडचणीत असताना ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल पक्ष सोडावा. मी कोणाला थांबवणार नाही. मी पक्षासाठी लढणारा आणि जिंकणारा शिवसैनिक आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. (Uddhav Thackeray expresses anger over the displeasure of corporators)

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव विसरून उद्धव ठाकरे गटाने आता आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईतील आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याकडून निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला जात आहे. या आढावा बैठकीत अनेकांनी नाराजीचा सूर आळवत आपल्याला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी निश्चित करताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नाराजांपैकी अनेक जण शिंदेच्या शिवसेनेशी आणि भाजपाच्या संपर्कात आहेत. अनेक जण भाजपाकडून उमेदवारी मिळवून निवडणुका देखील लढवू शकतात, अशी शक्यता माजी नगरसेवकांनी बोलून दाखवलीआहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : शरद पवार चाणाक्ष आहेत; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडक भूमिका घेत नाराजांना धीर देण्याऐवजी पक्षाशी असलेल्या बांधिलकीवर भर दिला. पक्ष अडचणीत असताना निष्ठा दाखवण्याची गरज असते. जो संघर्ष करतो, तोच खरा शिवसैनिक आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी खुशाल सोडावा, असे ठाकरे यांनी कुंपणावर असलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.

- Advertisement -

नगरसेवकांचे नेमके म्हणणे काय?

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नगरसेवक उपस्थित होते. पण या बैठकीत नगरसेवकांकडून नाराजीचा सूर उमटल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Local Government Bodies : महायुतीचे संकेत देताना उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -