घरताज्या घडामोडीदानवे म्हणतात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रस्ताव सादर करणार, मुख्यमंत्री म्हणाले मी...

दानवे म्हणतात नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रस्ताव सादर करणार, मुख्यमंत्री म्हणाले मी…

Subscribe

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर हे सरकार प्रत्येक पावलावर मजबूतीने उभे राहिल्याशिवाय राहणार नाही

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये उपस्थित आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नागपुर-बुलेट ट्रेनसाठी प्रेजेंटेशन सादर करणार असल्याचे सांगितले आहे. दानवेंच्या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून नागपूर-बुलेट ट्रेन करणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी तुम्ही मला साथ दिली तर या देशाच्या पंतप्रधानांना भेटून मी सांगू शकतो की मुख्यमंत्री मदतीला तयार आहेत. तुम्हीही मदत करा, जरुर आपल्या राज्यासाठी रेल्वे आणू असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रावासाहेब दानवे काय म्हणाले?

व्यासपीठावर कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, मराठवाडा मागासलेला असल्याचे आपण म्हणत होतो. परंतु आता ती स्थिती राहिली नाही. गावांशी गाव जोडलं, दळणवळणाची साधनं सुरु केली तर विकास होतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला पैसे कुठे दिला असेल तर समृद्धी महामार्गाला दिला आहे. हा मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा जालना-नांदेडसाठी निधी उपलब्ध करुन दिला. एमआयसी सारखा प्रकल्पात उद्योगमंत्री नितीन देसाईंनी लक्ष देऊन काम केले आणि नवीन उद्योग कसे येतील यासाठी प्रयत्न केला आहे. अनेक प्रकल्प येतील परंतु अतिवृष्टी कधी दुष्काळ हा नेहमीच मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे. आता अतिवृष्टी झाली आहे यामुळे मदतीची घोषणा कराल अशी अपेक्षा दानवेंनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मराठवाड्यातील संभाजीनगर शहर हे रेल्वेचे इंजिन आहे. हे रेल्वे कशी ओढायची हे आम्ही ठरवून आपल्याकडे येऊ, तुम्ही भाषणात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. माझ्याकडून तुम्ही आपेक्षा व्यक्त करत असाल तर मला सुद्धा आपल्याकडे आपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार केला की समृद्ध महामार्ग जर मुंबईपासून नागपूरपर्यंत जाणार असेल. आणि भविष्यात प्रसंग आला तर याच मार्गाने रेल्वे न्यायला लागली तर जागा घेऊन ठेवली पाहिजे. मुंबई- नागपूरपर्यंत बुलेट ट्रेन येऊ शकते अशाप्रकारचे सादरीकरण आम्ही तयार केले आहे. फक्त ३८ टक्के जागा ताब्यात घ्यावी लागेल. पावणेदोन तासात मुंबई ते नागपुरचा प्रवास पुर्ण होऊ शकतो यासाठी आपला वेळ घेऊन चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे.

मी राज्यमंत्री असलो तरी माझ्या काही मर्यादा आहेत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी तुम्ही मला साथ दिली तर या देशाच्या पंतप्रधानांना भेटून मी सांगू शकतो की मुख्यमंत्री मदतीला तयार आहेत. तुम्हीही मदत करा, जरुर आपल्या राज्यासाठी रेल्वे आणू असे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे दानवेंना आश्वासन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, आपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही. आम्ही तुमच्याकडे आपेक्षा व्यक्त करायच्या, तुम्ही आमच्याकडे आपेक्षा व्यक्त करायच्या हे सुरुच राहणार आहेत. परंतु आज मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर शब्द देतो जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर हे सरकार प्रत्येक पावलावर मजबूतीने उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे. कारण ही आमची इच्छा आहे. यामध्ये राजकारण आणू इच्छित नाही. पण आमची आपेक्षा अशी होती की, देशातला पहिला मार्ग जो अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनचा होतोय त्याशिवाय आमची इच्छा अशी होती की, आपल्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी हा जोडणारा जर का लोहमार्ग जसा आपण समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-नागपुर बुलेट ट्रेन होणार असेल तर मी तुमच्या सोबत आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, पर्यटन समृद्धीसह मुख्यमंत्र्यांच्या १९ घोषणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -