घरताज्या घडामोडीकारच्या सनरूफबाहेर येऊन ठाकरेंनी साधला शिवसैनिकांशी संवाद, 55 वर्षांपूर्वींची पुनरावृत्ती

कारच्या सनरूफबाहेर येऊन ठाकरेंनी साधला शिवसैनिकांशी संवाद, 55 वर्षांपूर्वींची पुनरावृत्ती

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर टीका केली होती.

आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. कारच्या सनरूफबाहेर येऊन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी शिंदे गटावर टीका केली. धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजपला दिलं आहे. मात्र, यावेळी उद्धव ठाकरेंनी कारच्या सनरूपबाहेर येऊन भाषण केलं, त्यामुळे अनेकांना बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षांपूर्वी केलेल्या भाषणाची आठवण झाली.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कारच्या बोनेटवर उभं राहून भाषण करतानाचा फोटो अनेकवेळा व्हायरल झाला आहे. 30 ऑक्टोबर 1968 साली मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया भागात बाळासाहेबांनी गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केल्याचं शिवसैनिकांकडून सांगण्यात येतं. त्यांनीही अशाचप्रकारे कारच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. आता अशाच प्रकारची पुनरावृत्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी देखील कारच्या सनरूपबाहेर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय. पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही. असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे भाषण करत असताना मातोश्रीबाहेरील रस्त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि प्रियांका चतुर्वेदी हे नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.


हेही वाचा : पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा, नेमकं काय घडलं?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -