तेव्हा शिंदेंना सुरक्षा पुरवू नका, असं ठाकरेंनी सांगितलं होतं; सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सकाळी 8.30 वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केलाय

Shiv Sena MLA Suhas Kande's petition in Mumbai High Court against Election Commission
शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, याचिकेवर 15 जून रोजी हायकोर्टात सुनावणी

नाशिकः युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे ते आदित्य ठाकरेंकडे आमचं काय चुकलं असा सवालही उपस्थित करणार आहेत. सुहास कांदेंनी आदित्य ठाकरेंच्या भेटीपूर्वीच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका, असं तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना तेव्हाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा सुहास कांदेंनी केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा नक्षलवाद्यांकडून तत्कालीन नगरविकास मंत्री आणि तत्कालीन गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला होता. पण उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सकाळी 8.30 वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केलाय.

एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असतााना त्याला ठार मारण्याची मिळत आहे. पण तरीही तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवली नाही, तरीही हिंदुत्वाच्या विरोधात त्यांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली नसल्याला सवालही कांदे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंची शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदे भेट घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी आमदार सुहास कांदे “माझे काय चुकले?”, असे निवेदन देणार आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सुहास कांदे रवाना झालेत. परंतु त्यापूर्वी कांदे यांच्या ताफ्यातील गाड्यांना शिवसैनिक अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यात भेट होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचाः सुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर