घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती अस्वस्थ, पाठदुखी-मानदुखीमुळे वैद्यकीय चाचण्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती अस्वस्थ, पाठदुखी-मानदुखीमुळे वैद्यकीय चाचण्या

Subscribe

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने भूमीपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्हिसीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री मानेला पट्टा लावून असल्याचे दिसले. यावरुन अनेक चर्चा सुरु झाल्या मात्र अधिक माहिती काढल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजले. पाठदुखी आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे पालखी मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या मानेला पट्टा असल्यामुळे अनेकांनी तब्येतीची विचारपूस केली तसेच माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क केला असता मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे वृत्त खोटं असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठदुखी आणि मानेचा स्नायूच्या दुखापतीमुळे पट्टा लावण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच त्यांची तब्येत आता ठीक असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठदुखी आणि मानेच्या स्नायूची दुखापत झाली असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांचे अहवाल सकारात्मक असल्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत.

पालखी मार्गामुळे वारकऱ्यांचा मार्ग सुकर

पालखी मार्गांचे भूमीपूजन करताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं आहे. पालखी मार्गामुळे वारकऱ्यांचा मार्ग सुकर होईल. भक्तीमार्गावरून आतापर्यंत वाटचाल सुरु आहे तो मार्ग सुकर होण्यासाठी प्रयत्न केलेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. परकीय आक्रमण झाल्यानंतर सुद्धा वारी सुरू राहिली. पुढील कार्यासाठी, काम लवकर होण्यासाठी, महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मी जाहीर वचन देतो महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही पावलावर कमी राहू देणार नही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू. मी स्वत: वारीचं दर्शन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची फोटोग्राफी हेलिकॉप्टरमधून केली. विराट दर्शन म्हणजे काय हे मला दिसलं. डोळ्यात मावत नव्हतं एवढं मोठं दर्शन होतं. पालख्या सागराकडे वाहत आहेत असं वाटत होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपने एसटीचे विलिनीकरण का केले नाही?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -