घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : मला नाही अब्रू मी कशाला घाबरु; ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लोबाल

Uddhav Thackeray : मला नाही अब्रू मी कशाला घाबरु; ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लोबाल

Subscribe

श्रीरामपूर सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतायेत, कोण पिकवतो ते धान्य? मोदी नाहीत पिकवत त्यांच्या पारस बागेमध्ये. मोदींच्या बागेतील अन्न ते देशातल्या ऐंशी कोटी कुटुंबांना मोफत दिलं जात नाही. शेतकरी जे पिकवतात ते दिलं जातं. आ

श्रीरामपूर (अहमदनगर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज 13 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, श्रीरामपूर येथे आयोजित सभेत त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना आता कुठल्या शब्दांत बोलू असं झालं आहे, असं वाटतं फडणवीसांचं असं झालं की, मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशा शब्दांत त्यांनी गृहमंत्री फडणवीसांवर हल्लोबाल केला आहे. (Uddhav Thackeray I am not afraid why should I be afraid Thackerays rant on Fadnavis)

श्रीरामपूर सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतायेत, कोण पिकवतो ते धान्य? मोदी नाहीत पिकवत त्यांच्या पारस बागेमध्ये. मोदींच्या बागेतील अन्न ते देशातल्या ऐंशी कोटी कुटुंबांना मोफत दिलं जात नाही. शेतकरी जे पिकवतात ते दिलं जातं. आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे. एक ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा, राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांचं कोणत्या शब्दांत वर्णन करावं, तेच मला कळत नाही. कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, नालायक बोलून झालं. काहीच फरकच पडत नाही. आता बेगुमानपणाने वागतायेत. निर्लज्जम सदा सुखी. पण आता ज्या अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायेत.

- Advertisement -

हेही वाचा : BJP Politics: राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांसोबत ‘या’ नेत्याचंही नाव चर्चेत? बैठकीत निर्णय; भाजपामध्ये धुसफूस

मी मागच्याच सभेत बोललो की, त्यांची परिस्थिती आता मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे. तुम्ही काहीही बोला, मला काही फरक पडत नाही. जो निर्लज्ज असतो, तोच सदा सुखी असतो. काहीही मुख्यमंत्री पदावरुन हटवून उपमुख्यमंत्री केलं तरीही आनंदात आहे अशी त्यांनी मानसिकता करुन ठेवली आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाण यांची चूक फडणविसांनी केली दुरूस्त

गडकरींचा दाखला देत भाजपामधील निष्ठावंताची मांडली व्यथा

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नितीन गडकरी जे बोलले होते की, इकडे (भाजप) जो निष्ठेने काम करतो त्याला महत्व नाही. हे खरं आहे. हे आता कळेल अशोक चव्हाणांना, जेव्हा राज्यसभेवर पाठवतील तेव्हा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता अशोक चव्हाणांना डोक्यावर बसवल्यानंतर जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हा धक्का आहे. अरे मी कोणासाठी काम करतोय? असा प्रश्न त्यांना पडत असेल. हे असे उपरे घेणं म्हणजे पक्षाची वाढ नाही, ही पक्षाला आलेली सूज आहे. भाजप सुजलाय, सत्तेच्या मस्तीने सुजलाय, ही मस्ती तुम्हाला उतरवावी लागणार आहे असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -