घरताज्या घडामोडीआमचे गल्लीतील क्रिकेट मेनरोडवर आलेच नाही, मुख्यमंत्र्यांनी शेअर केला गल्ली क्रिकेटचा किस्सा

आमचे गल्लीतील क्रिकेट मेनरोडवर आलेच नाही, मुख्यमंत्र्यांनी शेअर केला गल्ली क्रिकेटचा किस्सा

Subscribe

जगाव कस हेच अनेकदा आपण विसरून जातो. आरोग्यासाठी खेळाची सुद्धा गरज आहे. एक छंदाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ जे मागे पडत चालले होते, त्यांना आपण प्रोत्साहन देतो आहोत. ज्या मातीपासून आपल नातं तोडल जात होत ते पुन्हा आपण जोडतो आहोत. मला अभिमान आहे, की सिडको तसेच नगरविकास खात्याने तसेच आदित्यने हे तरूण पिढीचे वाढणारे वेड ओळखूनच फुटबॉल खेळासाठीचा पुढाकार घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पिढीतील क्रिकेटच्या आवडीचाही किस्सा शेअर केला. तसेच नव्या पिढीच्या फुटबॉल खेळाच्या निमित्ताने असणाऱ्या आवडीचेही स्वागत केले. नवी मुंबईतील स्पोर्ट्स सिटी संकल्पनेचेही त्यांनी कौतुक केले. नवी मुंबईत खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कअंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स हे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या वास्तुच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

स्पोर्ट्स सिटी संकल्पनेचे कौतुक

या एका जागी चार फुटबॉल पिचेस निर्माण करणे ही खायची गोष्ट नाही. त्याठिकाणी पटकन एखादा विकास येऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. पण तस होऊ न देता जगाव कस यासाठी आरोग्यदायी जीवन यासाठी क्रीडा प्रकार महत्वाचे आहे. नुसत फुटबॉलचे मैदान न ठेवता. स्पोर्ट सिटीच्या संकल्पनेचाही त्यांनी कौतुक केले. सगळ्या खेळासाठी सगळ्या सुविधा देशातील पहिले राज्य असेल असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय खेळासाठीच्या सगळ्या सुविधा या स्पोर्ट्स सिटीअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

आमचे गल्लीतील क्रिकेट मेनरोडवर आलेच नाही

आम्ही क्रिकेटवेडे होतो. आम्ही गल्लीत क्रिकेट खेळायचो, ते क्रिकेट कधी मेनरोडवर आलच नाही. अशी अनेक मुले माझ्या वयाची होती, ज्यांना वाटायचे की आपण क्रिकेटीयर व्हावे, पण संधी कुठे होती ? तेव्हाचे क्रिकेटीयर्स मोठ्या मैदानातून आले असे नाही. अनेक क्रिकेटपटू हे गल्ली क्रिकेटमधूनच पुढे आले. हे क्रिकेट मात्र उपजत असावे लागते.

 

- Advertisement -

मी आणि रेफ्री दोघेच स्टेडिअममध्ये तटस्थ होतो

 

आता फुटबॉल हा वेगळा प्रकार आहे. आता आदित्य फुटबॉलमध्ये रस घेतोय, तेजस फुटबॉल खेळायचा. तेजसने आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. या फुटबॉलच्या निमित्ताने आमचही परदेशात जाण येण झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर परदेशातील वेड म्हणजे हे फुटबॉलचा खेळ आले. मॅचेस दरम्यान क्लबचे झेंडे फडकावणे, एकमेकांवर टिप्पणी करणे हे एक प्रकारचे वेड असते. त्यातच बाचाबाची म्हणजे काय ? हे सांगताना त्यांनी पु ल देशपांडेंच्या म्हैसचे उदाहरण दिले. या फुटबॉलच्या सामन्याच्या स्टेडिअममध्ये मी आणि रेफ्री दोघेच तटस्थ होतो असाही अनुभव त्यांनी सांगितला.

पायाच्या खेळात डोक वापराव लागतं

फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ असला, तरीही या खेळासाठी डोक वापराव लागत. अगदी बुद्धीबळासारखाच हा वेगाने चालणारा खेळ आहे. कारण वेगाने खेळ चालतानाच तुम्हाला विचारही तितक्याच वेगाने करावा लागतो. त्यामुळे आपले सरकारही अशा खेळांना प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. इच्छा आहे की, वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्तानची टीम दरारा निर्माण करणारी निर्माण होईल. फुटबॉलपटू होण्याची स्वप्न जागतिक दर्जाची असावीत हीच इच्छा आहे. आपली टीम चांगली कामगिरी करेल, अशी प्रामाणिक इच्छा आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -