घरताज्या घडामोडीशरद पवारांसह देशातील 'या' दोन मोदी विरोधकांचा उद्धव ठाकरेंना फोन

शरद पवारांसह देशातील ‘या’ दोन मोदी विरोधकांचा उद्धव ठाकरेंना फोन

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला. मात्र पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे सर्वसामान्य जनतेशी बातचीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला. मात्र पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे सर्वसामान्य जनतेशी बातचीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांना देशातील दोन मोदी विरोधकांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात फुट पडली असली तरी, उद्धव ठाकरे यांना धीर देण्यासाठी इतर पक्षातील नेतेमंडळी पुढे सरसावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Uddhav Thackeray informed that Mamata Banerjee and Nitish Kumar called me)

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला होता. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील मला फोन केला असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“आज आमच्या पक्षावर ही वेळ आली. आमचे नाव आणि चिन्ह चोरले. देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवार तर सोबत आहेत. पण मला ममता बॅनर्जी यांचा फोन आला. देशातील अन्य बडे नेतेही माझ्याशी बोलत आहेत. माझ्याप्रमाणे उद्या कोणावरही अशी वेळ येऊ शकते. आताच जर एकत्र आलो नाही तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत. हुकुमशाही सुरु होईल”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

- Advertisement -

हेही वाचा – “संजय राऊत नाशकात येऊनच दाखवा” शिंदेंच्या युवासैनिकांचा गंभीर इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -