घरताज्या घडामोडीबारसू रिफायनरी वाद : 'हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न कराल तर...', उद्धव ठाकरेंचा इशारा

बारसू रिफायनरी वाद : ‘हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न कराल तर…’, उद्धव ठाकरेंचा इशारा

Subscribe

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंनी राज्याकर्त्यांना बारसूत येऊन रिफायनरीचे सर्मथन करून दाखवा असे आव्हान दिले.

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंनी राज्याकर्त्यांना बारसूत येऊन रिफायनरीचे सर्मथन करून दाखवा असे आव्हान दिले. तसेच, ‘हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन’, असा इशाराही ठाकरेंनी दिला. (Uddhav Thackeray interaction with protesters opposing Barsu Refinery slams maharashtra government)

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- Advertisement -

“मधल्या काळात आपलं जेव्हा सरकार होते. त्याच्याआधी नाणार प्रकल्प आपण सगळ्यांनी जोर लावून रद्द करून घेतला. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी काही जण माझ्यावर आरोप करू लागलो की, यांना कोकणाचा विकास नको आहे. कोकण यांना संपूर्ण कंगाल करायचं आहे. पण कोणत्याही परिस्थितीत हे पाप मी डोक्यावर घ्यायला तयार नव्हतो. आता सध्या सुपाऱ्या घेऊन जे दलाल फिरत आहेत, कोणच्या सुपाऱ्या घेऊन फिरत आहेत याची सर्वांनाच कल्पना आहे. पण मी हे ठरवलं होतं की, मी तुमच्या समोर येईन. आज मी मुख्यमंत्री नाही. पण माझ्यावर आज आरोप केले जात आहेत की, उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या या गावात जमीनी आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना का लिहिलं पत्र?

- Advertisement -

“मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे लोक सध्या सुपारी घेऊन फिरत आहेत, त्यांनी मला आग्रह केला होता की, या गावात ओसाड जमीन आहे. वस्ती कमी आहे. तसेच, ग्रामपंचायतीने ठराव केला आहे की, इथे रिफायनी केली तर आम्हाला चालेल. त्यामुळे आपण त्यावेळी एक प्राथमिक पत्र दिलं. त्यानुसार रिफायनरीच्या कंपनीला आणि तिथल्या लोकांना मान्य असेल तर तुमच्याशी बोलीन”, असा खुलासाही यावेळी ठाकरेंनी केला.

“मी जे पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये असे कुठे लिहिलंय की, वाटेल ते होऊ दे. कोणाची डोकी फुटली तरी चालेल. गोळ्या घातल्या तरी चालतील. लोक भिकारी झाली तरी चालतील. पण रिफायनी करा. असे माझं म्हणणं आहे का? त्यावेळी माझे म्हणणं होतं की, रिफायनी येणार असेल तर ती काय असते हे आधी येतील लोकांना दाखवा”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“जर मी नाणारला विरोध केला होता तर, मला सांगला तिकडे काय वेगळे आहे आणि इकडे काय वेगळं आहे. तिकडेही माणसं राहत आहेत. इकडे पण माणसं राहत आहे. आंबा, काजू, कोकम हे तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. पण त्या तुलनेत ही जागा ओसाड असेल तर, मग हा तुमचा प्रश्न आहे? तुम्हा सांगाल तसं पुढे घडले”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

या लोकांना मंत्री असताना तीन जिल्ह्यातील लोक सुद्धा ओळखत नव्हती

“आपल्या मुख्यमंत्र्यांची 33 देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. मी मार्ग सांगण्यासाठी त्यांचा उल्लेख केला, नाहीतर घेतले नसतं. आज गद्दांना 33 देशांमध्ये ओळखले जाते. पण त्यावेळी हे मंत्री असताना या लोकांना तीन जिल्ह्यातील लोक सुद्धा ओळखत नव्हती”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आपल्या डोळ्यासमोर आपल्या राज्याचे मुडदे पाडले जात असून जर त्याला विकास म्हटला जात असेल तर, अशा विकासा मी मानणार नाही आणि असा विकास होऊही देणार नाही. ही काही हुकूमशाही नाही. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन”, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

“निवडणुका तोंडावर आल्यानंतर पंतप्रधानांपासून सर्वच जण येथे प्रचाराला येतील. आज मी जन की बात ऐकायला आलोय, मन की बात करायला आलेलो नाही. त्यामुळे आपल्या शिवसेनेबद्दल विश्वास कायम ठेवा. माझे राज्यकर्त्यांना आव्हान आहे की, त्यांनी बारसूत येऊन रिफानरीचे समर्थन करून दाखवावे”, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी केला.


हेही वाचा – “शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही..”, सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -