Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'मी उद्धवला म्हटलं चल माझ्यासोबत....' राज ठाकरेंनी सांगितला २००३ चा प्रसंग

‘मी उद्धवला म्हटलं चल माझ्यासोबत….’ राज ठाकरेंनी सांगितला २००३ चा प्रसंग

Subscribe

शिवसेना फुटण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार - राज ठाकरे यांचा पाडवा मेळाव्यात हल्लाबोल

मुंबई – शिवसेना पक्ष फुटण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आसपासचे काही लोकच जबाबदार आहेत. शिवसेनेची आजची अवस्था होण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असा घणाघात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केला आहे. राज यांनी उपस्थित जनतेला २० वर्षे मागे नेले आणि म्हणाले, ‘सारखं महाबळेश्वरच्या प्रसंगाची आठवण करुन दिली जाते. त्यापूर्वी काय घडलं हे मात्र कोणी सांगत नाही. २००३ साली मी उद्धवला सोबत घेतलं आणि हॉटेल ओबेरॉला गेलो. तिथे समोरासमोर बसवलं आणि विचारलं, तुला काय पाहिजे. पक्षाचा अध्यक्ष व्हायचं, तर म्हणाला हो. मुख्यमंत्री व्हायचे का विचारल्यावर म्हणाला हो.’

हेही वाचा : शिवधनुष्य एकला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही; राज ठाकरेंचा उद्धव, एकनाथ शिंदेंना टोला

- Advertisement -

२००३ मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केला आहे. शिवसेना वाढवणाऱ्यांना, पक्षातून बाहेर कसे पडतील अशी वेळ त्यांच्यावर आणण्यात आली, असाही आरोपही राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर केला. यासाठी त्यांनी आणखी एक प्रसंग यावेळी सांगितला. ते म्हणाले, ‘मी बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. उद्धव ठाकरेंना समजावून सांगितले आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव यांना बोलवायला सांगितले, मात्र ते निघून गेले.’ याचा सरळ अर्थ होता की त्यांना शिवसेनेत मी नको होतो. मला सांगितले गेले, प्रचारासाठी बाहेर पडू नको. मग मी पक्षातून बाहेर पडलो, असं सांगत राज ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेतून का बाहेर पडावे लागले हे १७ वर्षानंतर सांगितले आहे.

हेही वाचा : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री मनसे कार्यालयात, आमदार राजू पाटील यांनी केले एकनाथ शिंदेंचे स्वागत

- Advertisement -

नारायण राणे हे देखील शिवसेनेतून कधीच बाहेर पडले नसते, मात्र त्यांना बाळासाहेबांना भेटूच दिले गेले नाही, असाही आरोप राज यांनी केला. ते म्हणाले, ‘मी नारायण राणेंना म्हणालो, बाळासाहेबांशी बोला. तेही तयार झाले. मी बाळासाहेबांना फोन केला आणि विचारले राणेंना बोलावू का? तर मागून आवाज येत होता, आणि बाळासाहेब नाही म्हणाले’. याची आठवण राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने सांगितली. राज ठाकरे म्हणाले, तेव्हा जे पेरलं जात होतं त्याची फळ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या फुटीची कारणं तिथं आहेत. हा शिवसेनेच्या राजकारणाचा शेवट आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : मुंबई आहे की डान्स बार, तेच कळत नाही; सुशोभीकरणावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

- Advertisment -