घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे हे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होईल -...

उद्धव ठाकरे हे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होईल – अरविंद केजरीवाल

Subscribe

उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पूत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार असल्याचे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते.

उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पूत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार असल्याचे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. (Uddhav Thackeray is the son of a tiger he will win all the upcoming elections says Arvind Kejriwal)

या भेटीनंतर तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. “मागील काही दिवसात महाराष्ट्रात खूप घडामोडी घडल्या असून अद्याप घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. हे वाघाचे पूत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार आहे”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

“भाजपाला फक्त गुंडगिरी येते. बाकी काही नाही. घाबरट लोक ईडी, सीबीआयचा वापर करतात. त्यांना आमची भीती वाटते, म्हणूनच ते याचा वापर करतात. आम्हाला फरक पडत नाही, सत्याचा विजय होणार”, अशी टीकाही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केली.

“देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेऊनही अनेकांना नोकरी मिळत नाही. या युवकांना मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. 2 ते 4 कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्याची आश्वासने देण्यात आली होती. पण अजूनही नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. इतकी महागाई वाढली आहे की, लोकांना घरचा खर्च भागवता येत नाही. एकीकडे लोकांचा पगार वाढत नाहीये तर, दुसरीकडे त्यांचा खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी देश गहाण ठेवतंय; अरविंद केजरीवालांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -