घरमहाराष्ट्रठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार; निशाण्यावर नेमकं कोण?

ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार; निशाण्यावर नेमकं कोण?

Subscribe

मुंबईः मालेगाव येथील उद्धव ठाकरे यांची सभा थोड्या वेळातच सुरु होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सभेसाठी मोठे स्क्रिनही लावले आहेत. त्यामुळे या स्क्रिनवर नेमका कोणता व्हिडिओ लावला जाणार आहे याचीही चर्चा सुरु झाली आहे.

सभेसाठी उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. सुरक्षेच्या उपाय योजना केल्या जात आहेत. या सभेचे बॅनर उर्दुत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या टीका होत आहे. विरोधकांनी सोशल मीडियावर या बॅनरवर जोरदार टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती आता शिवसेना नाही तर, ‘अली सेना’ झाली असल्याची टीका केली आहे. या टीकेला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, देशात कोणत्याही भाषेवर अजून बंदी आलेली नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या सभेला येत आहेत, यामुळे ते (शिंदे-फडणवीस) अस्वस्थ आहेत. आम्ही सर्व समाजाच्या लोकांना निमंत्रित केले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांच्या हुकूमशाहीविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे, ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

त्यामुळे या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हेही बघावे लागेल. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात सभा घेणार आहेत. ज्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. या सभेमधून उद्धव ठाकरे हे पुन्हा राज्यातील जनतेला संदेश देणार असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने महत्वाची असणार आहे. कारण उत्तर महाराष्ट्रात असलेल्या नांदगाव, जळगाव धुळे येथे ठाकरे गटाचे कोणतेही प्रभावी नेतृत्व अद्याप तरी नाही. ज्यामुळे या भागात नेतृत्व तयार करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या बांधणीसाठी आजची सभा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -