घरमहाराष्ट्रशेतकऱ्याने रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही; उद्धव ठाकरेंची टीका

शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही; उद्धव ठाकरेंची टीका

Subscribe

मालेगावः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्याने रक्ताने पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांना वाचता येत नाही. भाषण कसे वाचता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत हाणला.

मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेला तुफान गर्दी झाली आहे. उर्दुतील बॅनर, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई, राज ठाकरे यांनी २० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची करुन दिलेली आठवण, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या सर्व विषयांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

ते म्हणाले, आपले मुख्यमंत्री शेतकरी आहेत. ते दिवाळीत शेती करत होते. त्यांच्या शेतात हेलिपॅड उतरते. असे हे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिलेले नाही. ते कोणाच्या तरी दावणीला बांधले गेले आहेत. त्यांच्याकडून शेतकरी काय अपेक्षा करणार आहेत. मी मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तुमच्यासाठी लढतो आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे.

न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश आहेत. म्हणून लोकशाही टिकून आहे. ज्या दिवशी तेथे सरकारची माणसे येतील तेव्हा न्यायालयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा घ्यावी लागेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.

- Advertisement -

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात सभा होत आहे. ज्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने महत्वाची आहे. कारण उत्तर महाराष्ट्रात असलेल्या नांदगाव, जळगाव धुळे येथे ठाकरे गटाचे कोणतेही प्रभावी नेतृत्व अद्याप तरी नाही. ज्यामुळे या भागात नेतृत्व तयार करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या बांधणीसाठी आजची सभा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– शिवसेनेवर प्रेम करणारा एक माणूस तुम्ही घेऊन जाऊ शकले नाही.
– तुमच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का, तो कधीही पूसला जाणार नाही.
– मुंबईचं, महाराष्ट्राचं वस्त्रहरण करण्यासाठी हे मिंधे सरकार राज्यात बसवलं आहे.
– शिवसेना ही आमचीच. शिवसेना ही माझ्या वडिलांनी निर्माण केली आहे, मिंध्यांच्या वडीलांनी नाही.
– निवडणूक आयोगाचं गांडूळ करुन टाकण्यात आले आहे. मात्र सुप्रीम कोर्टात अजून न्यायाचे रामशास्त्री बसलेले आहेत. तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे.
– मिंधे हे उरावर घेतलेलं ओझं, असं चंद्रकांत पाटील म्हणले होते.
– बावनकुळे हे शिवसेनेला फक्त ४८ जागा देणार आहेत. आहो, बावनकुळे तुमच्या नावाला शोभेल अशा किमान ५२ तरी जागा द्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -