शहरांत वाहनतळांची संख्या वाढवणे, ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Vaccination uddhav thackeray instruction complete 100 percent 1st covid dose vaccination before 30 november
Vaccination : राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लसीकरण १०० टक्के करा, मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधीत विभागाला निर्देश दिले आहेत.

राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


कोविडमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळणे, व्यवसाय करात सूट मिळणे, शाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करणे, राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्किंग जागा उपलब्ध करणे, कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसची कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यात, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणे, अशा मागण्या महासंघाने केल्या. तसेच वित्त व परिवहन , पोलीस यांच्यासमवेत त्या मागण्यांसंदर्भात योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.

चित्रपटगृहांच्या समस्यांवर तोडगा

चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक सुरक्षा तपासणी करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले. एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदेंचे प्रत्युत्तर