घरदेश-विदेशराजकीयदृष्ठ्या एकत्र नसलो तरी नाते तुटलेले नाही

राजकीयदृष्ठ्या एकत्र नसलो तरी नाते तुटलेले नाही

Subscribe

मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची मन की बात

‘राजकीयदृष्ट्या आम्ही सत्तेत एकत्र नसलो तरी आमचे नाते तुटलेले नाही’, असे महत्वाचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीनंतर केले. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्याशी संबंधित अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जवळपास दीड तास बैठक सुरू होती. यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्ध्या एक तासाची वैयक्तिक भेट झाली. पत्रकार परिषदेत या भेटीविषयी विचारणा केली असता ठाकरे यांनी भाजपबरोबरच्या नात्याची भावना जागवली.

उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण याचा अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचे नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकार्‍यांना आत्ताही पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे असे सांगितले तर त्यात चुकीचे काय?, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि हे व्यक्तिगत बोलणेच होते. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकार्‍यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली? असे विचारले असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावे, असे ते म्हणाले.

केवळ मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली. भेटीनंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण याचा अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचे नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचे असेल, असे सांगितले तर त्यात चुकीचे काय?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

मधल्या काळात मोदींचा फोन आला आणि राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि हे व्यक्तिगत बोलणेच होते. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकार्‍यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली? असे विचारले असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावे, असे ते म्हणाले.

या बैठकीत महाविकास आघाडी सरकारकडून खालील प्रमुख १२ मुद्दे मांडले गेले –
१. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी
२. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
३. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा
४. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
५. केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत द्यावा
६. पीक विमा अटी-शर्थींच्या सुलभीकरणावर चर्चा
७. बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
८. चक्रीवादळानंतर मदतीचे निकष बदलण्याबाबत
९. १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा
१०. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या
११.राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
१२.नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे

राज्यपाल कोश्यारींची मोदींकडे तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल पावणे दोन तासांच्या या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मात्र, त्याचबरोबर, काही राजकीय विषय देखील चर्चेला आल्याचे समजते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधानांकडे तक्रार केल्याचीही चर्चा आहे.

पंतप्रधानांशी झालेल्या भेटीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या अडवणुकीच्या भूमिकेबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांची नावे राज्य सरकारने मागील वर्षीच राज्यपालांकडे पाठवली आहेत. सर्व संकेत आणि नियमांना धरून ही प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, अद्यापही राज्यपालांनी या नावांना संमती दिलेली नाही. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असून उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही बाब देखील पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे समजते.

विरोधकांची टीका
दिल्लीतील आजच्या बैठकीतील चर्चेच्या मुद्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठकीत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, राजकीय मुद्दे या बैठकीत मांडले गेले. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा केली गेली. हे आमदार पुढची १२ हजार वर्षे नेमले नाहीत तर काही बिघडणार नाही,’ अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केली.

मोदी-ठाकरेंमध्ये अर्धा तास वैयक्तिक भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत भेटले. त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. सुमारे एक तास झालेल्या या चर्चेनंतर उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींना व्यक्तिगत भेटले. त्यावेळी अजित पवार, अशोक चव्हाण तेथे नव्हते. केवळ मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली. भेटीनंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी काहीशा संतापात त्यावर प्रतिक्रिया दिली. मी काय नवाज शरीफ यांच्या भेटीला गेलो नव्हतो. राजकीयदृष्ठ्या एकत्र नसतो तरी नाते तुटलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण याचा अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचे नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचे असेल, असे सांगितले तर त्यात चुकीचे काय?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगले काम करत आहे सांगितले हे व्यक्तिगत बोलणेच होते. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकार्‍यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत, असे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली? असे विचारले असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान सर्व विषय सकारात्मकरित्या सोडवतील-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व विषयांवर व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी आमचे गांभीर्याने ऐकून घेतले आहे. राज्याचे जे विषय आम्ही मांडले, त्याची माहिती घेऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आम्ही जे विषय मांडले ते पंतप्रधान सकारात्मकरित्या सोडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.

मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकर्‍यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे, असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी जीसएटी भरपाई मिळणे बाकी आहे. कोरोनाचे संकट सर्वांवर असून आर्थिक दिलासा देण्यासाठी हे पैसे लवकर मिळाले तर फायदा होईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. वादळाचा फटका बसल्यानंतर मदतीचे निकष बदलण्याची गरजही यावेळी मोदींकडे बोलून दाखवण्यात आली. २०१५ चे नियम आपण बदलण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसेच १४ व्या वित्त आयोगातील थकीत १ हजार ४४ कोटींचा निधी तात्काळ मिळावा, अशी मागणी केल्याचे अजित पवारांनी सांगितले.

संवाद सुरू झाला याचा आनंद- फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद प्रारंभ केला, याचा आनंद आहे. अशा संवादाचा नेहमी फायदाच होतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर बरे होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारित असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता आहे. देशातील अन्य राज्यात ते आरक्षण सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्ग आयोग गठीत करून पुढील कारवाई करावी लागणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने जी न्या. भोसले समिती गठीत केली होती. त्यांनी फेरविचार याचिका आणि त्याने उद्देश साध्य न झाल्यास पुढची मागासवर्ग आयोग, आवश्यक माहितीचे संकलन ही कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही कृती न करता केंद्र सरकारला भेटून काहीही फायदा नाही. पदोन्नतीतील आरक्षण हा राज्य सरकारने काढलेल्या जीआरसंदर्भातील विषय आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीने उद्धव ठाकरेंनी काय साधले?

१) केंद्र सरकारशी संबंध सुधारण्याच्यादृष्टीने पाऊल
शिवसेनेने भाजपसोबत युती असतानाही ती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील संबंधात वितुष्ठता आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून केंद्र सरकारवर विशेषत: पंतप्रधान मोदींवर जहरी टीका करण्यात येत होती. त्यामुळे हे संबंध अधिकच ताणले होते. मंगळवारच्या भेटीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र संबंध सुधारणेच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले.

२) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समज
मागील काही महिन्यांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. राष्ट्रवादीचे काही मंत्री, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याशी उच्च स्वरात बोलतात, अशी तक्रार उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडेही केली होती. मोदींशी वैयक्तिक चर्चा करून आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी व्यतिरिक्त इतर पर्यायही खुले आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला दिला आहे.

३) देवेंद्र फडणवीस यांना ताकद दाखवण्याचा प्रयत्न
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी राज्य सरकारची अनेक प्रकरणे बाहेर काढली. इतकेच नव्हेतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अनेकदा अडचणीत आणले. त्यामुळे फडणवीस यांना इशारा देण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट घेतल्याचे कारण असू शकते. आपल्या नेत्यांशी आमचे जवळकीचे संबंध आजही कायम आहेत, असे उद्धव ठाकरे यांना फडणवीसांना दाखवून द्यायचे आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -