Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'धनुष्यबाण' कोणाचं? ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात

‘धनुष्यबाण’ कोणाचं? ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या फुटीमुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. आता दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला जात आहे. या परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, यानंतर सध्या या प्रकरणावर न्यायालयीन लढाई सुरु आहे. याबाबत सातत्याने काही ना काही घडामोडी घडत असून आता ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

दोन्ही गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले. मात्र निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत निर्णय देण्यापूर्वी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाच्या एकल पीठाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे एकल पीठाच्या या आदेशाला उद्धव ठाकरे यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे. ज्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयात कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतले 40 आमदार आणि काही खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना हा पक्ष पूर्णपणे फुटला. यानंतरही अनेक आमदार शिंदे गटात सामील होऊ लागले. यादरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक झाली, त्यावेळी खरी शिवसेना कोणाची यावरून पेच निर्माण झाला. 8 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हा वापरता येणार नाही असे आदेश दिले.

- Advertisement -

यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं. तसेच ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल- तलवार हे चिन्ह देण्यात आलं. त्यामुळे दोन्ही गटात अद्याप नाव आणि चिन्हावरून वाद सुरुचं आहे.


जी-२० परिषद म्हणजे नेमके काय रे भाऊ?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -