Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, 'न्यायदेवतेवर विश्वास, 12 तारखेला सुनावणीचा...

सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, ‘न्यायदेवतेवर विश्वास, 12 तारखेला सुनावणीचा निकाल’

Subscribe

ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही,' अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ होताना दिसतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता बंडखोर आमदारांकडून मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहे. या दाव्यावरून आता शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडून जाणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील न्यायालयीन लढ्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात असत्यमेव जयते हे वाक्य नाही तर सत्यमेव जयते हेच वाक्य आहे, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, न्यायमंदिरावर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल, हा शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल, शिवसेनेचं काय होईल, शिवसैनिक मजबूत आहेत, शिवसेनेचे काही वाकड होऊ न देण्याची ताकद मनगटात आहे. अस उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आणि शिवसेनेकडेच राहिलं

“एक आमदार असो पन्नास असो १०० असो हे सगळ्याचे सगळे गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही, हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय, या संभ्रमातून शिवसैनिकांना आणि नागरिकांना हेच सांगतो की, तुम्ही अजिबात भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका, विधीमंडळ पक्ष वेगळा असतो आणि रजिस्टर पक्ष हा वेगळा असतो. त्यामध्ये असंख्य मतदार, नागरिक, सदस्य, पदाधिकारी खूप साऱ्या गोष्टी आल्या. पदाधिकाऱ्यांना असचं कोण उचलून घेऊ जाऊ शकत नाही. सगळ्यांना पैशाची आमिष आणि दमदाट्या करून नेऊ शकत नाही. त्यामुळे धनुष्यबाणाबाबत कोणताही संभ्रम कोणीही मनात ठेवू नका, धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेकडेच राहिलं. घटना तज्ज्ञांशी बोलूनच मी सांगतोय, अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांना ठणकावले आहे .

देशाच्या वाटचालीला दिशा दाखवणार हा निकाल असेल

- Advertisement -

शिवसेना हा पक्ष आज विधीमंडळात जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय.
कैलास पाटील, नितीन बाकीचे आहेतच.. त्यांनाही दडपण, आमिष आणि धमक्याही देण्यात आल्या. तरी देखील काही वाटेल तो होऊ दे आम्ही नाही हटणार, अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय हा नक्की असतो. या केसमुळे देशात लोकशाहीचं अस्तित्व, भविष्य किती काळ टिकणार आहे, लोकशाही किती काळ मजबूत राहणार आहे हे स्पष्ट होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे ठरवणार आणि देशाच्या वाटचालीला दिशा दाखवणार हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल. हा निकाल याकडे देशासह जगाचं लक्ष आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरी फोटो समोर येत आहेत की, एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले, मुळात महापालिका, पालिका अस्तित्वात नाहीत, त्यामुळे हे म्हटले तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात त्यांच्या आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारसीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. अशा शब्दात शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना नेत्यांवर टीक केली.

…तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही

- Advertisement -

एका गोष्टीचा अभिमान आहे की, साधी साधी लोकं येत आहेत. काल परवापर्यंत आपण बघितलं असाल की, शिवसेना भवनमध्ये राज्यातील सर्व जिल्हा महिला प्रमुख आल्या होत्या. त्या वाघिणीसारख्या बोलत होत्या मात्र त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. ज्यांच तळहातावर पोट आहे, उत्पन्नाचे साधनही नाही अशीही लोक येतायत रडतायतं, एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे की, शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी काय होती काय आहे याच विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं. अगदी साधी त्याचा काय उल्लेख करण्याची मला गरज नाही. तोच आमच्या अभिमानाचा विषय आहे, या साध्या लोकांच्या मेहनतीचे मोठेपण मिळाले ही लोकं मोठी झाली.. ती मोठी झालेली माणसं गेली… पण ज्यांनी मोठं केलं मोठ्या मनाची, मोठ्या हिंमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहे. हीच माणसं जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही. मुद्दा काय येतो, शिवसेना कोणाची? शिवसेना आहे ती आहेच…. शिवसेना म्हणजे एखादी गोष्ट नाही की घेऊन पळत सुटला. कोणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही, असा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर दाव्या करणाऱ्यांना ठणकावले आहे.

ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत

आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलायला लागलेत. आणि मातोश्रीने आजही आम्हाला सन्माने बोलावलं आणि जर भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार आहोत. मी आधीच बोललो होतो…सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा.. इकडेच सुरत दाखवून बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं, मग पर्यटन करण्याची गरज नव्हती. ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. पण हे प्रेम बंडखोर आमदार दाखवत आहेत, हेच प्रेम गेली दोन अडीच वर्षे जी लोकं, जो पक्ष याच घराला, याच घराण्याला, मला माझ्या कुटुंबियांवर अश्लाभ्य आणि विकृत भाषेत टीक करत होते तेव्हा या कोणाचं तोंड उघडल नाही. यांच्यापैकी एकही जण यांना विरोध होईल असं बोलला नाही, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झाले 

त्याच लोकांच्या हे गाठीभेटी घेत आहेत, त्यांना मिठ्या मारता आहात मग तुमचं हे प्रेम खर आहे की तकलादू आहे हे जनतेला कळू द्या. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचे यांचे प्रयत्न चालले होते. अशा लोकांसोबत तुम्ही मांडीला मांडू लावून बसत आहात त्यांच्याकडून स्वागत स्वीकरता आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही,’ अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले आहेत.


धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -