उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान, म्हणाले ‘तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही….’

uddhav thackeray open challenge to bjp modi govt shinde fadanvis govt

पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मत मिळू शकत नाही. हे तुम्ही मान्य केलं आहे. हे मोदी यांनासुद्धा मान्य करावं लागलं आहे. मोदी का आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा.. का? असा सवाल करत हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. होऊन जाऊ द्या, असं थेट आव्हानं शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाने माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात जाहीर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. या कार्यक्रमावेळी मंचावर आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

होऊन जाऊ द्या, आज जे नाटक आहे ना आमने सामने, येऊ द्या आमची तयारी आहे. तुम्ही मोदींच्या फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा, नेत्याचा बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला, यावर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, त्यांच्यात ती हिंमत नाही.  निवडणूकीला सामोरं जाण्याची त्यांच्यांत हिंमत नाही. माझ्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार याची चिंता, पण हे समोर बसलेले शिवसैनिक आहेत ना ते ठरवलीत तुम्ही कोण आहात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्यला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी विचारतात की,  तैलचित्राबद्दल काय? मी म्हटलं की, मी ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? हे त्यांना विचारण गरजेचे आहे, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचे तैलचित्र लावता त्याचा आनंद, पण त्यामागचा हेतू वाईट 

घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. वडील चोरणारी अवलाद मी दसऱ्या मेळाव्यात बोललो होतो,  दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. वडील कोण काय माहिती. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे काल म्हणाले की, शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसं आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

जसं नेताजींच्या मुलीने सांगितलं, शताब्दी जरुर साजरी करा. पण त्यांचे विचार मान्य आहे का? त्या बोलल्या आहेत की, सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार आहे. हे चालू आहे सगळं, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.