घरताज्या घडामोडीKolhapur byelection : अटलजी, अडवाणीजी कुठे आहेत ? होर्डिंगवर सरपंच अन् पंतप्रधानपदालाही...

Kolhapur byelection : अटलजी, अडवाणीजी कुठे आहेत ? होर्डिंगवर सरपंच अन् पंतप्रधानपदालाही एकच फोटो- उद्धव ठाकरे

Subscribe

आज कोल्हापुरातील होर्डिंगमध्ये बाळासाहेब आहेतच, पण तुमच्या किती होर्डिंगमध्ये अटलजी आणि अडवाणीजी दिसतात ? कोल्हापुरातील कोणत्या होर्डिंगमध्ये हे दोन नेते दिसतात ? अडवाणीजींनी हिंदुत्वाची दिशा दिली, ते अडवाणी आज कुठे आहेत? ना अटलजींचा पत्ता ना अडवाणीजींचा. सरपंचपदालाही एकच फोटो पंतप्रधान पदालाही एकच फोटो. म्हणजे हेच आम्हाला कळतच नाही की सरपंचपदासाठी ही व्यक्ती उभी आहे की पंतप्रधान पदासाठी ? अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी भाजपच्या टिकेचा समाचार घेतला. भाजपने होर्डिंगवर आता सोनियाजींचा फोटो दिसतो अशा शब्दात शिवसेनेवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अतिशय आक्रमक शब्दात या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहेत.

ही परिस्थिती तुम्हीच आणली…

शिवसेनेच्या होर्डिंगवर आता सोनियाजींचा फोटो असतो अशी टीका केली जाते. पण याआधी अटलजींचाही फोटो असायचा, मोदीजींचा फोटो हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. पण तुम्ही ही परिस्थिती आणली. तुम्हाला हिंदुह्दयसम्राटांसाठी इतकच प्रेम असेल, तर मधल्या काळात तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. हिंदुह्दयसम्राटाच्या खोलीत अमित शहांनी जे मला वचन दिले ते वचन का नाही पाळले असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तुमच इतकच प्रेम आहे, तर नवी मुंबई एअरपोर्टला हिंदुह्दयसम्राटांचे नाव देण्यासाठी विरोध का होत आहे ? मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला भाजपकडे मागणी करूनही हिंदुह्दय सम्राटांचे नाव देण्यात आले नाही. शेवटी आम्ही महाविकास आघाडी सरकारने ते नाव दिले. आता या महामार्गाचा पहिला टप्पा खुला होत आहे. फक्त नागपुरता मर्यादित हा महामार्ग न ठेवता गडचिरोलीपर्यंत हा महामार्ग आम्ही नेत आहोत.

- Advertisement -

आम्ही झेंडा, रंग अन् नेता बदलला नाही

नकली भगव्याचा बुरखा फाडायला हवा. त्याला सोयीप्रमाणे हिरवा, निळा रंग आम्ही लावलेला नाही. अस्सल भगवा हा शिवरायांचा भगवा आहे. आता हा भगवाही तुम्ही खोटा ठरवायला लागलात. शिवसेना १९६६ जन्माला आली, तेव्हापासून शिवसेनेने आपला रंग बदलला, ना विचार बदलला, ना नेता बदलला. आजही आमच्या मनात अन् होर्डिंगवरही बाळासाहेब ठाकरेच आहेत. तुमचा जन्म झालेला जनसंघ, त्यानंतर तुम्ही जनता पक्षात गेलात, त्यानंतर गांधीवादी समाजवाद ही तुमची विचारधारा होती. त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी एक वेगळी दिशा दिली. भगवी दिशेने दिल्लीपर्यंत पोहचू शकतो, म्हणूनच तुम्ही हिंदुत्वावर आलात.

देशात बनावट हिंदुह्दयसम्राट बनवण्याचा प्रयत्न

देशात भाजपने बनावट हिंदुह्दय सम्राट बनवण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेने त्यांना झिरकाडल. हिंदुह्दयसम्राट म्हटल्यावर एकच चेहरा समोर येतो तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसर कोणतही नाव समोर येत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते होऊच शकत नाही. हिंदु अडचणीत असताना मदतीला धावून येणारा म्हणजे हिंदुह्दयसम्राट. हिंदु अडचणीत असताना घरी बसून नंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया सम्राट ठरू शकतात, पण हिंदु ह्दयस्रमाट होऊ शकत नाहीत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -