घरमहाराष्ट्रगोळीबारनंतर उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?; या ठिकाणी होणार सभा

गोळीबारनंतर उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?; या ठिकाणी होणार सभा

Subscribe

खेड येथील गोळीबार मैदानात नुकतीच उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. खेड हा माजी आमदार रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे. तेथे सभा घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे २६ मार्च रोजी सभा होणार आहे. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीमध्येही उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेना आमदार, खासदार यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. 

मुंबईः रत्नागिरीमधील खेड येथे जाहिर सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची आता नाशिकच्या मालेगाव येथे सभा होणार आहे. मालेगाव येथे सभा घेऊन उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मंत्री दादा भुसे यांनाच आव्हान देणार आहेत. खेड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांना ढेकणाची उपमा दिली. त्यामुळे मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खेड येथील गोळीबार मैदानात नुकतीच उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. खेड हा माजी आमदार रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे. तेथे सभा घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे २६ मार्च रोजी सभा होणार आहे. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीमध्येही उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेना आमदार, खासदार यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.

- Advertisement -

खेड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की, ढेकणं चिरडायला तोफांची गरज नाही. ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भाजपा तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
ही ढेकणं आपले रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडणार आहे. तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नाव आणि पक्ष माझ्या वडिलांनी दिले आहे. निवडणूक आयोगाने हे दिलेले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांना बोलवा येथे. त्यांना ही गर्दी दाखवा. हीच खरी शिवसेना आहे. हो मी शिवसेनाच म्हणणार आहे. कारण शिवधनुष्य रावणाला नाही पेलवले तर या गद्दारांना कसे पेलवणार. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला मान्य नाही. मान्य होणारच नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -