औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्र्यांसह मंचावर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वगळता इतर सर्वांना ही चाचणी बंधनाकारक करण्यात आली असून औरंगाबाद पोलिसांनी यासंदर्भात आमदार अंबादास दानवे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

cm uddhav thackeray

शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत विक्रमी गर्दी होणार असल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर बसणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वगळता इतर सर्वांना ही चाचणी बंधनाकारक करण्यात आली असून औरंगाबाद पोलिसांनी यासंदर्भात आमदार अंबादास दानवे यांना पत्राद्वारे कळवले आहे. (Uddhav Thackeray rally in Aurangabad corona test is mandatory to those who present on the stage)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंचावर शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या सर्व ५९ जणांना कोरोना तपासणी करावी लागणार आहे. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली तरच त्यांना मंचावर जाता येणार आहे.

हेही वाचा औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, नामांतराच्या घोषणेची शक्यता?

दरम्यान, औरंगाबादमध्ये काल एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात सध्या १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ नये याकरता ही खबरदारी घेण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सभा झाली तेव्हा तेव्हा बदल घडला असल्याचा दावा शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, मुंबईची सभा ज्याप्रमाणे रेकॉर्डब्रेक झाली तशीच औरंगाबादचीही होईल, असं वरण सरदेसाई म्हणाले.

हेही वाचा – विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावललं

तसेच, या सभेसाठी मरावाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक येणार असल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. तर, एकट्या पैठणमधूनच २५ हजार लोक औंरगाबादेत येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी दिली आहे.