घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटक विधानसभा निकाल: उद्धव ठाकरे म्हणाले, सामान्य माणसांकडून...

कर्नाटक विधानसभा निकाल: उद्धव ठाकरे म्हणाले, सामान्य माणसांकडून…

Subscribe

 

मुंबईः देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करु शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला आहे. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिय उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा आणि आशेचा किरण दाखवला आहे. कॉंग्रेसचा प्रचंड विजय झालाच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुस्लिम, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. कॉंग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ च्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांचे खास अभिनंदन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेवर टीका केली आहे. स्वतःचं घर जळतंय त्याची काही लोकांना काहीच चिंता नसते. पण दुसऱ्यांचं घरं जळताना त्यांना आसूरी आनंद होतो, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर मी काही जणांच्या प्रतिक्रिया बघितल्या. बेगानी शादी मैं अब्दुला दिवाना अशी त्यांची अवस्था झाली आहे. असे अब्दुला मला खूप दिसत आहेत. त्यांना जग पिवळंच दिसत, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटावर केली.

एखाद्या वॉर्डाची पोटनिवडणूक झाली तरी ते टीका करतात. पोटनिवडणुकीत भाजप हरली तरी ते मोदी-शाह हरले अशीच प्रतिक्रिया देत असतात. पण कर्नाटका विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्र आणि देशावर होणार नाही. केंद्रात मोदी सरकारच निवडून येणार आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आहे. कारण विधानसभा निवडणुकींच्या विजयाचा कधीही केंद्रातील सत्तेतवर परिणाम होत नाही हा इतिहास आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -