आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खूपसला – उद्धव ठाकरे

cm uddhav thackeray

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांना संबोधीत केले. यावेळी त्यानी शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर टीका केली. आम्हाला लोक म्हणत होते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाठीत खंजीर पाठीत खूपसते पण येथे आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खूपसला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना एक विचार आहे आणि तो भाजपचा संपवण्याचा डाव आहे, कारण त्यांना हिंदू मतांमध्ये  फूट नको आहे,अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

ज्यांनी आपल्याला आव्हाने दिले त्यांचे आव्हान आपण संपवून पुढे जात राहिलो आपल्यामध्ये गद्दारांची औलाद नको असे म्हटले होते ते आता समोर आले आहेत. पाठीत खंजीर खुपसणारे आपले लोके आहेत. लोके म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस हे विष आहे तर आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन विष प्राषण केले आहे. मात्र, ते आपल्यासोबत राहणारच आहेत. पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणले ही निष्ठा तुम्ही दाखवली आहे. नगरसेवक निवडून आणणे हेच आपले वैभव आहेच आपले आमदार निवडून यायला लागले हे आपले वैभव आहे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राष्ट्रवादी आपल्याला त्रास देते, आमदार म्हणतात की आपण भाजपसोबत गेले पाहिजे. पण मी त्यांना म्हणालो की, भाजपने आपला विश्वासघात केलाय. भाजपकडून व्यवस्थित सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव येऊ द्या मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही, ते पद मला दुय्यम आहे, हा शिवसेना परिवार आहे. तुम्ही आता सांगा मी राजीनामा देतो असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 आमदारकी रद्द होईल –

माझ्या तब्येतीचे, आजारपणाचे कारण शोधून तुम्ही जर बंड करणार असाल ते अयोग्य आहे. या बंडाच्या मागे मी आहे असा संदेश पोहोचवला जातो आहे. मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला, आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य नाही.

सर्वसामान्य व्यक्ती निवडून येतील अशा ठिकाणी आताच्या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिले. त्या ठिकाणी तुमचा हक्क असतानाही तुम्ही माझा आदेश पाळला आणि त्यांना निवडून दिले. ज्यांना निवडून दिले ते आपल्याला सोडून गेले. आजही तुम्हाला सांगतोय की पक्ष चालवायला मी जर योग्य नसेल तर मला तसे सांगा, मी हे पद सोडतो. शिवसेना हा विचार आहे, तो विचार भाजप आता संपवायला निघाला आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारामध्ये भागिदार नको आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.