उद्धवसाहेब दुखावले नाही पाहिजेत, दीपक केसरकरांनी व्यक्त केली भावना

उद्धवसाहेब दुखावले गेले नाही पाहिजे, असा काळजीचा सूर दीपक केसरकर यांनी लावला आहे. त्यांनी आज सकाळीच एका खासगी वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलल होते.

deepak kesarkar
deepak kesarkar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपकडून आनंदाचा वर्षावोहत आहे. त्यामुळे उद्धवसाहेब दुखावले गेले नाही पाहिजे, असा काळजीचा सूर दीपक केसरकर यांनी लावला आहे. त्यांनी आज सकाळीच एका खासगी वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलल होते. (Uddhav thackeray should not be hurt says deepak kesarka )

हेही वाचाः उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता येणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, फडणवीसांचं असं म्हणणंय की मी आधी माझ्या लोकांशी बोलेन आणि त्यानंतरच पुढची पावलं टाकेन. आमची बैठक गोव्यात आहे. आमचा गट नाही.. सरकार येतात, सरकार जातात. विचार कसा टिकवायचा, हा महत्त्वाचा भाग आहे. मंत्रिपदं असणारी लोकं कशाला बंड करतील? केवळ याच्याकडे बंड म्हणून बघू नका. केवळ सत्तेसाठी केलेलं हे बंड नाही. पक्षात काही घडलं असेल, तर तो एक वेगळा विचार आहे. शिंदे साहेबांसोबत चर्चा फक्त सरकारच्या स्थापनेबाबत होत नाही, आपण ज्या विचाराने चाललोय, तो विचार मागे पडला, तर मग हे सगळं कशाला. ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी आम्ही काहीही केलेलं नाही.. मी खोटं बोलत नाही… तात्विक भूमिका बाजूला न ठेवता हे सगळं घडलं पाहिजे, असंही केसरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की,  “हा राजीनामा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. जो संघर्ष आम्हाला करावा लागला याला पूर्णपणे जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आहे आणि त्यापेक्षा जास्त जबाबदार हे संजय राऊत आहेत. रोज उठायचं आणि काहीतरी टीका करायची. असं करून त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक दुरावा निर्माण केला. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर झाला,”
उद्धव साहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. दहा दहा लोकं जेव्हा एकावेळेला बोलतात, तेव्हा अपमान होऊ शकतो, स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो.. ते होऊ नये म्हणून काळजी घेतोय, असंही केसरकर म्हणाले.