घरताज्या घडामोडी...तर राज्यात नाही फक्त केंद्रातच निवडणुका होतील; ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

…तर राज्यात नाही फक्त केंद्रातच निवडणुका होतील; ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

'या अध्यादेशाचा विचार केला तर आगामी काळात राज्यात निवडणुका होणार नाहीत फक्त केंद्रातच निवडणुका होतील. त्यामुळे देशातील जनतेला जागं करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत', असे शिवसेना उद्धव बाळासाहेब  ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

‘दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या अध्यादेशाचा विचार केला तर आगामी काळात राज्यात निवडणुका होणार नाहीत फक्त केंद्रातच निवडणुका होतील. त्यामुळे देशातील जनतेला जागं करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत’, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. (Uddhav Thackeray Slams Central Government Maharashtra Arvind Kejriwal Delhi CM Panjab)

या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या अध्यादेशावर हल्लाबोल केला. “मागील काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले. एक शिवसेना संदर्भातील आणि दुसरा दिल्लीबाबत होता. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक निकाल दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण त्याच्या विरोधात केंद्र सरकारने अध्यादेश आणला. ही कोणती लोकशाही आहे. हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्या प्रतिनिधींना काही अधिकार असतात. ते असायला हवेत की नाही? हे बघता असे वाटते की, आगामी काळात राज्यात निवडणुका होणार नाहीत फक्त केंद्रातच निवडणुका होतील. त्यामुळे देशातील जनतेला जागं करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

नातं जपण्यासाठी मातोश्री आणि शिवसेना प्रसिद्ध

“दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे अनेक नेतेमंडळींना दुसऱ्यांदा मातोश्री येथे माझी भेट घेतली. नातं जपण्यासाठी मातोश्री आणि शिवसेना प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करताता. पण आम्ही राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं जपत असतो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आगामी वर्ष निवडणुकीचे – उद्धव ठाकरे

“आगामी वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. यावेळेस ट्रेन सुटली तर, आपल्या देशातून लोकशाही नाहीशी होईल, त्यामुळे लोकशाहीला कायमस्वरुपी वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहे. आपण सगळे देशप्रेमी आहोत आणि देशातून जी लोकं लोकशाही हटवू पाहत आहेत. त्या लोकांना लोकशाही विरोधी आणि देशाचे विरोधी बोलले पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलोय. देशात लोकशाही वाचवणं गरजेचे आहे. आपण संविधान वाचवण्यासाठी आलो आहोत आणि लोकशाहीत सर्वोच्च न्यायालयाला खूप महत्त्व असायला हवे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – आरक्षणात गैरप्रकार : गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या कोकणात सोडाव्यात, अजित पवारांचं पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -