घरताज्या घडामोडीहे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय; ठाकरेंचा हल्लाबोल

हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय; ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

'मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय', अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज पार पडत आहे.

‘मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय’, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज पार पडत आहे. यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray Slams Cm Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis In Nagpur Meeting vvp96)

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तूच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. हा डेकोरेशनचा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिला. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं म्हणेन.

- Advertisement -

मी हल्ली शब्द जपून वापरायला लागलो आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता. पण फडतूस बोलण्यामागील माझा उद्देश काय होता? मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय.

पहिले युती होते, पण आम्हाला फसवलं, त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. आमच्या सरकारने काम केलं मग जनतेसमोर आलोय. सरकार गद्दारी करुन पाडलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू आणि करु तर छातीवर करु. हे अवकाळी सरकार आलं आहे. अयोध्येला मी, संजय राऊत सुद्धा गेलो होतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तो मुद्दा कोर्टात प्रलंबित होता. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचं सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. पण ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय?

- Advertisement -

मुख्यमंत्री खरे रामभक्त असते तर आधी सुरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले होते. आताचे उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नव्हते. पण हे जातील म्हणून तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? म्हणत ते सुद्धा गेले. रामराज्य महाराष्ट्रात कधी येणार? शेतकरी एवढा टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, सरकार पंचनामे करायलाही जात नाही. मग मुख्यमंत्री जातात आणि आदेश देतात की, ताबडतोब पंचनामा करा. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मदत पोहोचत होती की नाही? आता शेतकरी बोलत आहेत की, पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या. हे निर्लज्ज आहेत, मैतालासुद्धा जातील.

मी घरात बसून कारभार केला. पण त्यावेळी माझे सहकारीदेखील काम करत होते. काम करायचं असेल तर कुठेही करु शकतो. नुसतं वणवण फिरला म्हणून काम झालं म्हणता येणार नाही. जनतेला मदत झाली नाही तर तुमच्या पदाचा उपयोग आहे. त्यावेळी संकट असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. पंतप्रधान मोदींनीसुद्धा आठ वर्षात काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगत का नाही? ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव चोरलं, माझा बाप चोरलं, मग तुम्ही जनतेला कसं सांभाळणार?

चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी आव्हान देतो मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून येतो. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घेऊन या. मैदानात या, एका व्यासपीठावर बोला. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्ही जे बोलायचंय ते बोलू. जनता जनार्दन आहे

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. पण मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. इकडे आलेली माणसं माणसं नाहीत का? हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ते माणसं नाहीत? भाजपने जाहीर करावं त्यांचं हिंदुत्व काय? ते शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे. आम्ही काँग्रेसबरोबर गेलो. आम्हाल कोणी घालावलं? प्राण न जाये, पण वचन न जाए, असं काही नाही. खुर्ची मिळाली भरपूर झालं.

एका महिलेवर तिच्या कार्यालयात घुसून महिला गुंडांकडून हल्ला केला जातो. रोशनी शिंदे तिचं नाव. ती हात जोडून मारु नका विनंती करते. ती माफी मागते. त्याचा व्हिडीओ देते. तरीही तिच्या पोटात लाथा मारल्या जातात. पोलीस तक्रार करायला तयार नाहीत. दुसऱ्या दिवशी मोर्चा होता. ती रुग्णालयात असताना तिला अटक करण्यासाठी डिस्चार्ज मिळवण्यासाठी दबाव आणतात, मग मी हा गृहमंत्री फडतूस आहे असं म्हणालो, तुम्ही काय म्हणाला असता? हा कारभार संघ, मोदींना आणि अमित शाह यांना मान्य आहे का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -