‘ईकडे आपला कार्यक्रम सुरू असताना बाजूला दुसरा कार्यक्रम झाला. ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारते लय भारी’. हे सरकार थापा मारणारे आहे’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला. शिवसेना ठाकरे गटाते नेते उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीताल रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. (Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde and Maharashtra Government)
“काही जणांना अशी अपेक्षा आहे की मी गद्दारांवर बोलेन पण मी गद्दारांवर बोलणार नाही. गद्दारांचा समाचार घ्यायला तुम्ही समर्थ आहात. मी इथे तुमच्यासाठी आलोय, गद्दारांसाठी नाही. अनेक गद्दार झाले पण हिंगोली कायम शिवसेना प्रमुखांच्या, भगव्याच्या, हिंदुत्वाच्या, मागे उभे राहिलेले आहेत. आतासुद्धा काही गद्दार बेटकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेटकुळ्यांमध्ये हवाय इथे माझ्याकडे ताकद आहे”, अशा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
“आता श्रावण महिना सुरू झालाय. एक-एक सण येत आहेत. नुकताच नागपंचमी झाली. या गद्दाराची नाग समजून त्याची आपण पुजा केली, पण हा उलटा फिरून डसायला लागला. आता तुम्ही गावातली लोकं आहात, पायाखाली साप आला तर काय करायचं तुम्हाला कळतं. तो सुद्धा उलटा फिरून डसणारा.. तुला पुंगी वाजवली, दुध पाजलं सर्व वाया गेलं.. नाव हिंदुत्वाचं आणि धंदे अंबादास दानवेंनी समोर ठेवले. हे असे धंदे करणार हिंदू म्हणून घेऊ शकतो का? हा माझा सवाल आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याचे हिंदुत्व मानायचे का? उद्धटपणा करणारा असेल तर त्याचा उद्धटपण तुम्हाला चिरडावा लागेलच”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकाही केली.
सरकार आपल्या दारी अन् थापा मारते लय भारी
ईकडे आपला कार्यक्रम सुरू असताना बाजूला दुसरा कार्यक्रम झाला. ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारते लय भारी’. हे सरकार थापा मारणारे आहे. दुष्काळाच्या उंबरट्यावर आपण असतनाही अतिवृष्टी झाली त्याची अजूनही नुकसानभरपाई नाही दिली. सरकार बदलल्यानंतर किती पेरण्या केल्या तुम्ही? माता दुष्काळ आहे. शेतकऱ्याचा गुन्हा काय आहे. आसमानी संकट समजू शकतो पण या गद्दारांची सुलतानी आहे, त्या सुलतानीचा संकट खूप मोठं आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्यायावरून उद्धव ठाकरे आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. जे-जे शेतकऱ्यांच्या हिसासाठी आहे ते संपवण्याचं काम इथे बसलेले आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत. सरकारने यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर, ते पैसे देण्याचे काम सरकारने केलं पाहिजे. पण जो ग्राहक आहे त्याला कांदा देण्याचे काम सरकारने केलं पाहिजे. पण सरकार लक्ष देत नाही.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची प्रार्थना
“मी शंभू महादेवाला सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की, हे महादेवा हा आशिर्वाद मराठवाड्यातील नव्हेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दे.. सरकार कसेही असो, पण माझ्या बळीराजाला कुठेही अवकृपा होऊ देऊ नको. महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम कर आणि तुझ्या आशिर्वादाच्या या जलधारा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अशाच ठेव”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी महादेवाकडे प्रार्थना केली.