Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'डबल इंजिन सरकार... त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा', उद्धव ठाकरेंचा...

‘डबल इंजिन सरकार… त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

'डबल इंजिन सरकार त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा अजून किती डबे लागणार आहे काय माहिती नाही. जणू यांची आता मालगाडीच होणार वाटतं', अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला.

‘डबल इंजिन सरकार त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा अजून किती डबे लागणार आहे काय माहिती नाही. जणू यांची आता मालगाडीच होणार वाटतं’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला. हिंगोली येथील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis and Ajit Pawar)

“डबल इंजिन सरकार त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा अजून किती डबे लागणार आहे काय माहिती नाही. जणू यांची आता मालगाडीच होणार वाटतं. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करण्याचे कतृत्व नाही. तुम्हाला नेते बाहेरचे लागतात. माझे वडिल लागतात. कशाला दिल्लीतल्या वडिलांमध्ये मत मागायची हिंमत राहिलेली नाही का? चोरणार माझे वडिल आणि दुसऱ्या पक्षातील नेते चोरणार आणि बोलतात आम्ही हिंदुत्वावादी आहोत. हे कसले हिंदुत्व हे नामर्द आहेत. ही नामर्दांगी आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.

- Advertisement -

“काही दिवसांमध्येच आपली मुंबईत बैठक होत आहे. ‘इंडिया’ची बैठक होत आहे. ही बैठक विरोधकांची नसून देशभक्तांची बैठक आहे. भारतमातेचे चित्र ठेवलं आहे ते उगाचच नाही. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके घसरले की, इंडियाचा उल्लेख घमेंडिया केला. मग आम्हीही तुम्हाला घमेंडिये म्हणतो. पण आता जो NDA म्हणून शिल्लक आहे. त्याला काही आकार उकार आहे. NDA चा आता अमिबा झालाय. इतर पक्ष तोडून तुम्ही NDA करतात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी NDA वर केली.

आम्ही इंडिया नाव घेऊन पुढे आलो आहोत, तर तुम्ही आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनबरोबर करता. मग आम्ही कार अतिरेखी आहोत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी फडणवीसांना काही बोलणार नाही. कारण मी काही म्हटलं की त्याचा बोभाटा होतो. मी फडतूस बोललो होतो…पण आता नाही बोलणार. मागे एकदा कलंक बोललो होतो, पण आता बोलणार नाही. आता थापाड्या बोलणार होतो परंतु नाही बोलणार.. असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. पण भाजपामध्ये सध्या श्रीराम श्रीराम हे सुरू आहे. सर्व भाजपामध्ये आयाराम येत आहेत. या पक्षातून हा घे, त्या पक्षातून तो घे, त्या पक्षातुन तो घे. पण मला भाजपाच्या कार्यकर्त्यांची दया येते. कारण 25 ते 30 वर्ष आपण त्यांच्यासोबत युतीमध्ये होतो. अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाकडे न बघता पक्षासाठी आपला आयुष्य ओवाळून टाकलं. कधीतरी आपला भगवा फडकेल अशी त्यांना अपेक्षा आहे. पण भगवा फडकला. हे फक्त दांड्यापुरताच राहिले, फडकले दुसरेच. एवढ्यासाठीच तुम्ही भाजपा वाढवण्यासाठी काम केली. मी भाजपासोबतची युती तोडली असली, तरी मला त्या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत दया आहे. कारण पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत करणार आणि दुसरा कोणी उपरा आणून तुमच्यावर बसवला तर चालेल का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – शासन आपल्या दारी अन् थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -