घर ताज्या घडामोडी 'टरबूजालाही पाणी लागतं', नाव न घेता उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

‘टरबूजालाही पाणी लागतं’, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Subscribe

हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे सभेतील उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे सभेतील उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ‘राज्यात दुष्काळ हे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागतं’, अशा शब्दांत नाव न घेतला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray slams dcm devendra fadnavis)

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- Advertisement -

“फडणवीस यांना मी बोलणं सोडलं मागे मी त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाय “राज्यात दुष्काळ हे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागतं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला.

भारत-पाकिस्तान सामन्यावरुन पंतप्रधानांना सवाल

- Advertisement -

आगामी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठलं देशप्रेम आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.


हेही वाचा – ‘डबल इंजिन सरकार… त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisment -