घरताज्या घडामोडीshivsena dussehra melava : मी पुन्हा येईन म्हणणारे आता बसले आहेत -...

shivsena dussehra melava : मी पुन्हा येईन म्हणणारे आता बसले आहेत – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाषणाला सुरूवात केल्यानंतर सुरूवातीलाच विरोधकांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला कधी वाटू नये, मी तुमच्या घरातलाच आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला हाणला. काही जण मी पुन्हा येणार म्हणून गेले, ते आता बसले आहेत असाही चिमटा त्यांनी काढला. सत्ता, पद यापलीकडे जनतेचा आशीर्वाद हीच आमची शिवसेनेची ताकद आहे, असेही ते म्हणाले. (Uddhav Thackeray slams devendra fadnavis over chief minister post dasara melava 2021 )

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. शिवसेना पक्ष म्हणून आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणीही जन्माला आलेला नाही. शस्त्रपूजन केल्यावर खऱ्या शस्त्रांवर फुले उधळली हेच प्रेम प्रत्येक जन्मी मिळो हीच माझी प्रार्थने आहे. माझा कुटूंब माझा परिवार हीच शस्त्रे बाळासाहेबांनी दिली आहेत. मी मुख्यमंत्री आहे, हे कधीही वाटू नये. मी तुमच्या घरातला आहे हे वाटो, ही इश्वर चरणी प्रार्थना आहे. जे बोलत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे ते आता बसले आहेत. जे संस्कार असते, संस्कृती बाळासाहेबांनी दिले, मा साहेबांनी दिले. पदे काय आहेत, पदे येतील जातील, सरकार असेल पुन्हा येईल आणि जाईलही पुन्हा येईल. मी कुणीतरी आहे, अहमपणा जायला हवा. ज्या क्षणी हवा जाईल, तेव्हा जनता स्विकारेल. म्हणूनच मी जनतेशी नम्रतेने वागतो. कारण आशीर्वाद हीच आमची ताकद आहे, हेच वैभव आहे.

- Advertisement -

जनतेचा आशीर्वाद हीच ताकद आहे, ती कमावण्याची परंपरा शिवसेनेला मिळालेली आहे. मनात विषयांची गर्दी आहे. गर्दीत विचारांना विचारू शकत नाही की वॅक्सीन घेतली का ? विचारांना मास्क कसा घालणार ? माझ्या भाषणानंतर कधी चिरकायला मिळतय, कधी आम्ही चिरकतोय हेच काही जणांचे काम आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी बोलत नाही मी जनतेसाठी बोतो आहे. पण हल्ली विकृती आली आहे, हे चिरकणे आहे. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणे काहींचे कामच झाले आहे. पण ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा जन्माला आलेला नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ले करायचे, हे रोजगारी हमीचे काम काही जणांचे झाले आहे. किती पैसा तुम्हाला मिळतो आहे, की तुम्ही चिरकत रहा. पण माझा वाडा चिरेबंदी वेगळ्या प्रकाराने प्रयत्न केला तरीही भेदता येणार नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा अजुन जन्माला आलेले नाहीत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -