Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'लाचार सरकार दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल...', उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘लाचार सरकार दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल…’, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Subscribe

स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्यासाठी कायम सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कारण हे मिंदे आणि लाचार सरकार खूर्चीपुढे दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्यासाठी कायम सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कारण हे मिंदे आणि लाचार सरकार खूर्चीपुढे दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. सध्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरून राजकारण सुरू असून अनेकानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सर्वांनाच धारेवर धरले. (Uddhav Thackeray Slams Maharashtra CM Eknath Shinde and BJP)

सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “सगळ्या महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येणे गरजेचे आहे. शिवाय, सर्व शिवप्रेमींनी देखील एकत्र येणे गरजेचे आहे. पण केवळ आम्ही महाराष्ट्र बंद केला तर, त्यासाठी एकत्र येऊन चालणार नाही, तर पुढे एक स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्यासाठी कायम सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कारण हे मिंदे आणि लाचार सरकार खूर्चीपुढे दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबोडकर यांची आणि माझी येत्या काही दिवसांत भेट होणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सिमा वादावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, “कर्नाटकाचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील, तर आमचे मुख्यमंत्री गुवाहटीवरून परत आल्यानंतर ते गुवाहटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही. सर्व मत्र्यांना आणि आमदारांना घेऊन गुवाहटीला घेऊन जा आणि बेळगाव महाराष्ट्रात येऊदे असा नवस करा आणि नवसाने बेळगाव पदरात पडत असेल तर सर्वच प्रश्न नवसाने सोडवू. कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडले आणि हे सत्येच्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत. तर याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे”.

याशिवाय, “अयोध्येमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन करणार अशी घोषणा मी मुख्यमंत्री असताना केली होती. त्याही गोष्टीला या सरकारने स्थगिती दिली आहे, का मला माहिती नाही. पण प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्याची भवनं ही असतात. पण आपलं आणि कर्नाटकचं नात काय आहे, हे अद्याप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


- Advertisement -

हेही वाचा – बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा : उद्धव ठाकरे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -