घरताज्या घडामोडीमी 6 मेला बारसुत जाणार आणि लोकांची भेट घेणारच - उद्धव ठाकरे

मी 6 मेला बारसुत जाणार आणि लोकांची भेट घेणारच – उद्धव ठाकरे

Subscribe

‘महाराष्ट्रमध्ये बारसू विषय भडकला आहे. मी 6 मे रोजी बरसुत जावून लोकांना भेटणार आहे. तो काय पाकव्याप्त काश्मीर नाही आहे. पाहिले मी बरसुला जाणार आणि नतर सभेला जाणार आहे’, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray Slams Maharashtra CM Eknath Shinde At BKC In Mumbai)

“६३ वर्ष झाली मराठी माणसाने रक्त सांडून बलिदान देऊन ही राजधानी मिळवली. ही लढून मिळवलेली राजधानी आहे. मी जेव्हा हुतात्मा चौकात गेलो तेव्हा शिवसैनिक तिथे होते. त्यांनी जेबसंगितले ते धक्कादायक होते. काल आम्ही पोचलो तोपर्यंत सरकारचा एकही जण फिरकला नव्हता. आमच्या शिवसैनिकांनी तिथे सजावट केली होती. सकाळी शिंदे गेले असतील, पण त्यांना सांगायचे आहे की, हुतात्मा आहेत त्यांनी लढा दिला नसता तर तुम्ही मुख्यमंत्री झाला नसता”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“सगळ काही मजकडे पाहिजे दुसर कोणी मोठ झाले पाहिजे नाही असा काहींची भावना आहे. मोरारजी नावाचा नर राक्षस बसला होता मुंबई आणि गुजरातमध्ये गोळीबार केला होता. पोलिस एवढे मातले होते की, त्यांनी इमारतीवर अश्रू धुरांचा मारा केला. काही महिला बेशुद्ध पडल्या काही बाळ घुस्मटली. पण त्या महिला रणरानिगी होत्या त्यांनी पोलिसांना आव्हान दिले. काही करा पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी आत्यचार बघत असाल तर मराठी माणूस बसला आहे”, असे उद्धव ठाकरे म्हमाले.

“कर्नाटकची निवडणूक जोरात आली आहे. मोदी म्हणाले काँग्रेसने ९१ वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या नाही देत पण तुमची भोकं पडलेली पिंप माझ्याबद्दल आणि आदित्यवर बोलत आहेत. तुमची लोक वाटेल ते बोलत असतील तर आमची लोक बोलणारच. तुमची गप्प बसतील तर आमची सुद्धा बसतील. कान एकायला दिले आहेत तस तोंडसुद्दा दिले आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रमध्ये बारसू विषय भडकला आहे. मी 6 मे रोजी बरसुत जावून लोकांना भेटणार आहे. तो काय पाकव्याप्त काश्मीर नाही आहे. पाहिले मी बरसुला जाणार आणि नतर सभेला जाणार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -