‘ज्याला स्वत:चेच भविष्य माहीत नाही, ते आपले भविष्य ठरवणार’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

गेल्या आठवड्यात गेले होते स्वत:चा हात दाखवायला. म्हणजे ज्याला स्वत:चेच भविष्य माहित नाही, ते आपले भविष्य ठरवणार. आहो तमची हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. तुमचे भविष्य जे आहे. कुडबुडे जोतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे जोतिषी किंवा तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

गेल्या आठवड्यात गेले होते स्वत:चा हात दाखवायला. म्हणजे ज्याला स्वत:चेच भविष्य माहित नाही, ते आपले भविष्य ठरवणार. आहो तमची हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. तुमचे भविष्य जे आहे. कुडबुडे जोतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे जोतिषी किंवा तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली इथे शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा झाली. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या जाहीर सभेत एक लाख नागरिक सामील झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. (Uddhav Thackeray Slams Maharashtra CM Eknath Shinde)

चिखली इथल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “आपला दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला. तेव्हाच ठरवलं की, यापुढची पहिली सभा जिजाऊ यांच्या बुलढाण्यातच घेईन. कारण मराठी मातीमधली गद्दारी गाढायची असले, तर जिजाऊंचे आशिर्वाद घेऊन पुढे गेलो पाहिजे. म्हणून मी आज इथे सभा घेतोय”

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज भारतीय संविधान दिन आहे. मात्र या दिनाच्या शुभेच्छा देताना सध्या देशात हे संविधान सुरक्षित आहे का, असा प्रश्न पडतोय. चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांनी एक प्रश्न विचारला होता. आपल्याला लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यामुळे तुम्हाला लोकशाही पाहिजे की, हुकूमशाही हे आता तुम्हीच ठरवा”

“काही जण चाळीस रेडे घेऊन गुवाहटीला गेले. त्यांच्याच एका मंत्रिमंडळातील मंत्र्याने त्यांना रेडे म्हटले म्हणून मी रेडे म्हणालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम शिवतीर्थावर शपथ घेतली. पण हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले होते स्वत:चा हात दाखवायला. म्हणजे ज्याला स्वत:चेच भविष्य माहित नाही, ते आपले भविष्य ठरवणार. आहो तमची हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. तुमचे भविष्य जे आहे. कुडबुडे जोतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे जोतिषी किंवा तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटले की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं आणि हिंदूत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून पळाले”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

दरम्यान, विदर्भात शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील संजय गायकवाड आणि संजय रायमूलकर हे दोन आमदार तसेच खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.


हेही वाचा – गद्दारांच्या मागण्या पुरविण्यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जातोय; शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही; आदित्य ठाकरेंचा टोला