महाराजांचा अपमान करणारे पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर, आम्ही काय समजायचे? उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला. तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात, मग आम्ही काय समजायचे, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते.

Uddhav Thackeray called an urgent meeting of Thackeray group leaders

राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला. तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात, मग आम्ही काय समजायचे, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. यावरूनच आज उद्धव ठाकरेंनी भाजपावर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray Slams Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari BJP On Chhatrapati Shivaji Maharaj statement issue)

ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यातील शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राची जी अस्मिता आहे. तसेच शाहु, फुले, आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र आहे असे आपण म्हणतो. पण त्याच महापुरूषांचा अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात असेल, तर महाराष्ट्राने नमके काय समजायचे, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल काही नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. या नेत्यांविरोधात येत्या 17 तारखेला महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या मोर्चाबद्दलही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, “17 तारखेला काढण्यात येणार मोर्चा हा केवळ महाविकास आघाडीचा नाही. तर, हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असून, महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रप्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान येऊन गेले काही जण बोललो मी होतो म्हणूनच झालं असं नसतं . आजपर्यंत महाराष्ट्रात कितीतरी मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचा मोर्चा महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात असणार आहे. हा 17 तारखेला महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे, असंही ठाकरे म्हणाले.

‘केंद्रात आणि कर्नाटक राज्यात भाजप सरकार होते आणि राज्यात मिंदे सरकार आहे मग का होत नाही. पंतप्रधान या बाबातीत काही बोलणार आहेत की नाही. समृद्धी महामार्ग याचे आधीच उद्घाटन होणार होते मात्र पुल पडला आता तो पडला की पाडला हे माहीत नाही, असा संशयही ठाकरेंनी व्यक्त केला.


हेही वाचा – महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार वेगानं काम करतंय; पंतप्रधान मोदींकडून शिंदे – फडणवीसांचे कौतुक