घरताज्या घडामोडीभाडोत्री सैन्य आणल्यावर लोक का भडकणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

भाडोत्री सैन्य आणल्यावर लोक का भडकणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

Subscribe

मुख्यमंत्री म्हणाले की, अग्निपथ मुळे तरुण रस्त्यावर. ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषणा केलेल्या अग्निपथ घोषणेवरुन टाकीस्त्र डागलं आहे. भाडोत्री सैन्य आणल्यावर लोकं भडकणार नाहीत का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टोला लगावला आहे. अग्निपथ योजनेतील चार वर्षांच्या कार्यकाळावरुनसुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अग्निपथ योजनेतील त्रुटींवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कंत्राटीपद्धतीने भरती करण्यात येणाऱ्या सैन्याला मुख्यमंत्र्यांनी भाडोत्री सैन्य असं संबोधले आहे. अग्निपथ योजनेंतर्गत जवान ४ वर्षांसाठी सेवा देतील तसेच ४ वर्षांनंतर त्यांना निवृत्ती देण्यात येणार आहे. यापुढे काय जवान काय करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी साधलेल्या संवादादरम्यान भाजप आणि पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर. ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्नीवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नौकरीचा पत्ता नाही असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

- Advertisement -

शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात शिवाजी महाराज, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळच वापरा आणि फेका. मग ही लोक भडकणार नाही तर काय. तुम्हाला मत दिल ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याची निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही. प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो

महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगल काम करतोय. आमशा १३०० मतांनी पडले. आदिवासी हक्काचा माणूस. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले. हे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणी साठी नविन रक्त. देसाई रावतेंनी सांगितले तुम्ही निर्णय घेतला ते मान्य आम्ही शिवसैनिक. म्हणूनच आपण ५६ वर्षे टिकलो. शिवसेना अजून नुसते ५६ नाही तर अजून खूप पुढे जाणार अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तेरा घमंड चार दिन का है, पगले हमारी बादशाही खानदानी है, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -