Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जरा धीर धरा, मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजप-मनसेला फटकारले

जरा धीर धरा, मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजप-मनसेला फटकारले

घाई करुन राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आणणारी नाही ना याचा विचार करायला हवा.

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे. भाजपन- मनसेकडून राज्यातील मंदिर सुरु करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा असे सर्वजण म्हणत आहेत. त्यांना सांगतो जरा धी धरा, आपलं राजकारण होतंय परंतु जनतेचा जीव जातो. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला फटकारले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरील उपाययोजना आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व डॉक्टरांनची वैद्यकीय परिषद मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड टास्क फोर्स आयोजित माझा डॉक्टर या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांबाबत या वैद्यकीय परिषदेत राज्यातील सर्व डॉक्टरांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे सुरु करण्याची मागणी करणाऱ्यांना चांगलेच फटकारलं आहे. राज्यातील कोरोनाची दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट डोकं वर करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या लाटेत परिस्थिती भयावह होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात अनेकजण अनेक गोष्टी घाईने उघडण्याची मागणी करत आहेत. परंतु ही घाई समान्य जनतेची अडचण वाढवणारी आहे.

- Advertisement -

घाई करुन राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आणणारी नाही ना याचा विचार करायला हवा. राजकारण्यांनीसुद्धा याचा विचार केला पाहिजे. राजकारण आपल्या सर्वांचे होत असते मात्र त्यात जनतेचा जीव जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व राजकारणी मंडळींना केलं आहे. तसेच मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलन करायचे असल्यास कोरोना विरुद्ध करा असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सण-उत्सव काळात कोरोना वाढला

मागील वर्षी राज्यात कोरोना सण -उत्सव काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. यावर्षी आपण गाफील राहूल चालणार नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सणांच्या दिवसात गर्दी टाळा अशी माझी जनतेला विनंती आहे. आपलं लसीकरण झालं असले तरी मास्कचा वापर करायला हवा असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा :  आंदोलन कोरोनाच्या विरोधात करा, मुख्यमंत्र्यांची राजकारण्यांना विनंती


 

- Advertisement -