मोगॅम्बो खुश हुआ! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून, ते सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत.

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून, ते सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray Slams Union Minister Amit Shah and BJP On Pune Tour)

काल पुण्यात कोणीतरी आलं होतं. त्यांनी विचारलं, महाराष्ट्रात काय सुरू आहे? त्यावर हे म्हणाले, आज चांगला दिवस आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सोबत आलेल्या गुलामांना देऊन टाकलं. मग तो व्यक्ती म्हणतो, वाह! मोगॅम्बो खूश हुआ. होय ते मोगॅम्बोच आहे. मिस्टर इंडियात असच होतं ना. देशातील लोक भांडत राहावे आणि आपण राज्य करायचं, असच मोगॅम्बोला वाटत होतं, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी अमित शहांना टोला लगावला.

‘समोरचा हिंदु असला तरी काही फरक पडत नाही. कारण तो व्यक्ती आमच्या पक्षात असेल, तरच तो हिंदू आहे, नसेल तर त्याने हिंदुत्व सोडलेले आहे’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘निवडणूक आयोग मधीच आपला निकाल सांगेल, याची मला कल्पना नव्हती. निवडणूक आयोगाने काल आपला निर्णय दिला. आपले धनुष्यबाण चोरले. पण असे असले तरी, प्रभू रामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. मी काल रस्त्यावर उतरून आव्हान दिले आहे. ज्या लोकांना माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले आहे. त्यांनी हिंमत असेल तर, तुम्ही माझे चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझी मशाल घेऊन येतो बघूया काय होते असे आव्हानही दिल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘मागील २५ वर्ष आपण एकमेकांच्या विरोधात होतो. मी आजही हिदूत्व सोडलेले नाही. मी भाजपाला सोडले आहे, हिंदूत्वाला नाही. भाजपा म्हणजे हिंदूत्व नाही आणि त्याचे हिंदूत्व म्हणजे आमचे हिंदूत्व नाही. जे आम्हाला मान्य नाही. मला वडिलांनी (बाळासाहेब ठाकरे) यांनी शिकवल्यानुसार हे हिंदूत्वा नाही आहे. बाळासाहेबांनुसार राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदूत्व आहे. भाजपाचे हिंदूत्व म्हणजे लढाई लढवा, आपापसात वाद घाला. कुटुंब व पक्षात भांडण लावा आणि सत्ता मिळवा’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा –