घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : सोरेन यांना अटक तर अजितदादांना क्लीनचिट; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : सोरेन यांना अटक तर अजितदादांना क्लीनचिट; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेणमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपव टीकास्त्र सोडले.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेणमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीकास्त्र सोडले. आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्यांना मग नितीश कुमार का लागतात? असे म्हणतच आजच्याच वर्तमानपत्रात माजी मुख्यमंत्री सोरेन यांना अटक तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट अशा बातम्या छापून आल्या. तेव्हा जो सोबत येईल तो क्लीन आणि जो विरोधात असेल त्याला अटक अशी रणनीती भाजपची असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. (Uddhav Thackeray Soren Arrested Ajitdada Clean Chit Attack of Uddhav Thackeray)

पेणच्या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकच्या सभेमध्ये जे बोललो होतो की, आज आपण काँग्रेस सोबत गेलो. आजही या मंचावर काँग्रेससह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. अगदी शेकाप पक्षाचे सुद्धा जयंत पाटील आहेत. पण रायगडकरांना मी जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय. कारण, कारण त्यावेळीसुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून गेला नाही. विरोधात मतदान केलं होतं. आता रायगडमधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला, पण माझा रायगड तसाच आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. आता रायगडकर खुश झाले आहेत. कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं. आता तर आपण हुकूमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत. नुसतं मोदींच्या विरोधात नाही, मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत. रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे. कारण गेल्या वेळेला एवढं करूनसुद्धा रायगड ताठ मानेनं मोदी विरोधात उभा राहिला होता. आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखं मतदान होणार आहे. असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

मग नितीश कुमारांची गरज कशाला?

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता भाजपकडून एक घोषणा देण्यात आली आहे. अब की बार चारशे पार, मग चारशे पारची जर तयारी असेल तर मग तुम्हाला नितीश कुमार का लागतात? जो काही कारभार चाललेला आहे. हा खूप किळसवाणा सुरू असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : EVM : …ही मनमानी आणि शंभर टक्के हुकूमशाही, ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया 

- Advertisement -

आरोप करणारे हेच, क्लीनचिट देणारेही हेच

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सांगतात की अमूक-टमूक होगा, यह मोदी गॅरंटी है. पण मी रायगडकडे येताना मुंबईतील वर्तमानपत्र पहिली. काही बातम्या कापून पण आणल्या. एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत. एका बाजूला माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक आणि बाजूला एक बातमी आहे. अजित पवार यांना क्लीनचिट.

हेही वाचा : ED Inquiry : …कोणी त्याचा इव्हेंट केला नाही, अनिल पाटलांचा रोहित पवारांवर निशाणा

म्हणजे भ्रष्टाचार करा भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी है. तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीनचिट देणारे हेच, आणि जे सोबत येत नाहीत, म्हणजे एकाच दिवशी, नितीश कुमार भाजपासोबत गेले, ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि दुसऱ्या दिवशी, लालू प्रसाद आणि तेजस्वीला ईडीकडून नोटीस. तेव्हा मोदी गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? तेव्हा हुकूमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकतायेत मग तुम्ही विचार केला पाहिजे, तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाही. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशीह असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -