क्रिकेट किंवा राजकारणात लूज बॉल आला की फटका मारयाचा पण…., मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

uddhav thackeray speech at Wankhede Stadium sunil gavaskar dilip vengsarkar stand
क्रिकेट किंवा राजकारणात लूज बॉल आला की फटका मारयाचा पण...., मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

क्रिकेट किंवा राजकारणाध्ये लूज बॉल आला की फटका मारायचा पण फटका मारताना विकेट टाकायची नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वानखेडे मैदानावर लगावला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमधील आदरातिथ्य कक्षाला भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचे तर नॉर्थ स्टॅण्डला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील चांगलीच टोलेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमधील नॉर्थ स्टॅण्डचे दिलीप वेंगसरकर असे नामकरण करण्यात आले आहे. यावेळी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडूलकर याने वेंगसरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी असे म्हटलं आहे की, क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनले आहे. मलाही वाटायचे क्रिकेटर व्हावे पण ते शक्य झाले नाही. पण मी मैदानात उतरलो आहे. ते सुद्धा जगविख्यात संघातून उतरलो आहे. फक्त इथल्या धावपट्टीसोबत माझी आठवण आहे. क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो लूज बॉल आला का फटका मारायचा मग मात्र विकेट टाकायची नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

शमीरवरच्या टीका अशोभनीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वी झालेल्या इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या पराभवावर वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर शमीवर टीका करण्यात येत होती. परंतु त्या टीका अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. आपण आता येणाऱ्या सामन्यांमध्ये नक्की जिंकू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच क्रिकेट स्टेडियममध्ये व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघण्यापेक्षा स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघणार्‍यांना ते अधिक कळते, असे सांगत शरद पवार यांनी अप्रतिम कोपरखळी मारली.


हेही वाचा :  मुंबईकर खेळाडूंचे विक्रम मुंबईकरांकडूनच मोडले जावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास