‘बाबांनी अडीच वर्षांत प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी वेचला’; आदित्य ठाकरेंनी सांगितली आठवण

नांदगाव येथे जनतेशी संवाद साधत असताना वडील उद्धव ठाकरे हे कश्या पद्धतीने दिवस - रात्र जनतेसाठी काम करायचे हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला.

सध्या राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्व जनताच त्याची साक्षीदार आहे. गेल्या काही दिवसात शिवसेनेत झालेले बंड आणि त्यामुळे कोलमडलेली शिवसेना(shivsena) या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांनी वक्तव्य केलं आहे. ‘शिवसंवाद यात्रेच्या'(shiv sanvad yatra) निमित्ताने आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशात नांदगाव येथे जनतेशी संवाद साधत असताना वडील उद्धव ठाकरे हे कश्या पद्धतीने दिवस – रात्र जनतेसाठी काम करायचे हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला.

हे ही वाचा – गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

uddhav thackeray

गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी जवळून पहिले आहे. २४ तास ते जनतेसाठी काम करायचे आणि त्यामुळेच मी केव्हा केव्हा आईकडे जाऊन भांडायचो सुद्धा, असे वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान गेल्या काह दिवसांपासून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. त्यात उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत किंवा मतदार संघातील कोणत्याही कामासाठी वेळ देत नाहीत. हा बंडखोरी केलेल्या आमदारांचा मुख्य आक्षेप होता. ‘शिवसंवाद यात्रेच्या'(shiv sanvad yatra) माध्यमातून सध्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. याच ‘शिवसंवाद यात्रे’ दरम्यान नांदगाव येथे बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचे आरोप खोडून काढले आहेत.

Aditya Thackeray

हे ही वाचा – गेले ते गेले…पण हा भगवा इथे असाच फडकत राहणार; आदित्य ठाकरेंचा विश्वास

गेली अडीच वर्ष मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात वावर करत असताना बाबांचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचे काम स्वतः पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षांतला प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे. यावरूनच मी काही वेळा आईशी जाऊन भांडलो आहे. पुढे आदित्य ठाकरे(aditya thackeray) म्हणाले की मी सुद्धा बाबांशी जाऊन बोलायचो तेव्हा ते सतत मिटिंग मध्ये असायचे. सतत कामात व्यस्त असायचे. मी जेव्हा जेव्हा त्यांचीशी बोलायला याजचो तेव्हा तेव्हा ते मला म्हणायचे की ‘कामाचं बोल, राज्याचं बोल’ असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नांदगाव यथील त्यांच्या ‘शिवसंवाद यात्रेत'(shiv sanvad yatra) सांगितले.

uddhav thackreay

हे ही वाचा –  ‘माझ काय चुकलं’ आमदार सुहास कांदे यांचे काय आहेत सवाल ?

याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आणखी एक घटना सांगिलती, दिवाळींनंतर उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार होती आणि त्याचवेळी मला एका परिषदेसाठी स्कॉटलंडला सुद्धा जायचं होतं. त्यावेळी मी बाबांना विचारले की, तुमचं ऑपरेशन आहे, मी स्कॉटलंडला जाऊ की नको? तर त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आदित्य तू माझी चिंता करू नकोस. तू महाराष्ट्राचा मंत्री आहेस. असंही आदित्य ठाकरे(aditya thackeray) म्हणाले.

हे ही वाचा – आदित्य ठाकरेंनी याआधीच हे दौरे केले असते तर.., गुलाबराव पाटलांचा शिवसंवाद यात्रेवरून…

दरम्यान उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षांत चांगलं काम केलं आहे. तरीही तुम्ही गद्दारी का केली? असा सवालही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना केला आहे.