Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लूज कॉन्टॅक्ट झाला की स्पार्क होतो, मुख्यमंत्र्यांची रविंद्र चव्हाणांना कोपरखळी

लूज कॉन्टॅक्ट झाला की स्पार्क होतो, मुख्यमंत्र्यांची रविंद्र चव्हाणांना कोपरखळी

कनेक्शन आपल्याला स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. मजबूत ठेवलं पाहिजे...कारण थोडसं लूज ठेवलं ना की रविंद्र चव्हाणांसारखे होते

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीतील विविध विकास कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याबाबतीतले संभाषण गंमतीदार झालं आहे. केडीएमसीत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते दरम्यान भाजप आमदार रविंद्र चव्हाण आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत दाखल झाले होते. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधकारी आमने-सामने आले होते यामुळे संभाषणादरम्यान शाब्दिक चकमक उडाली होती. लूज कॉन्टॅक्ट झाला कि तो स्पार्क होतो असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविंद्र चव्हाण यांना उद्देशून म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांच्यातील संवाद

- Advertisement -

मुख्यमंत्री : अजूनही काही काही गोष्टी विश्वास ठेवायला कठीण जातात, पण आनंद देणाऱ्या नक्कीच आहेत. जशी आपली ओळख मला ती सभा आठवतेय.. मोदी साहेब आणि मी आपल्या प्रचाराच्या सभेला आलो होतो..आणि ते कपिल पाटील खासदार झाले आज केंद्रिय मंत्री म्हणून समोर बसले आहेत. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असेल तरीही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तुमचा आवाज तिथे जात नव्हता पण आपला कनेक्शन स्ट्राँग होते…त्याच्यामुळे हे कनेक्शन आपल्याला स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. मजबूत ठेवलं पाहिजे…कारण थोडसं लूज ठेवलं ना की रविंद्र चव्हाणांसारखे होते…लूज कॉन्टॅक्ट झाला कि तो स्पार्क होतो.

कपिल पाटील : ते पण स्ट्रॉंग करा

- Advertisement -

मुख्यमंत्री : तसं टाईट आपलं आहेच.

कपिल पाटील : त्यांचे रविंद्र चव्हाणांचे टाईट करा.

मुख्यमंत्री : रविंद्र चव्हाणांचे टेस्टर घालून बघतो आहे मी.. वातावरण थोडंस खेळीमेळीचे पाहिजे… राजकारण राजकारणाच्या जागी असते त्यालाही माझी हरकत नाही.


हेही वाचा : रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला


 

- Advertisement -