घरताज्या घडामोडीपर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

पर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

Subscribe

डेक्कन ओडिसीमध्ये कॅबिनेट करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यटन विभागाला पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्याची सूचना केली आहे. राज्यात ८०० लेण्या, गड किल्ले, सह्याद्री पर्वत रांग असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी पोहचण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाल्यास परदेशातून येणारा पर्यटकच आपला एम्बेसिडर झाला पाहिजे अशी सुविधा निर्माण करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील पर्यटनाविषयी माहिती देण्यासाठी आपल्याला ब्रँड एम्बेसेडरची गरज भासते परंतु उत्तम सुविधा करुन येणारा पर्यटकच आपला एम्बेसेडर कसा होईल यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटान दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे की, येणारा पर्यटक पहिल्यांदा येताना येऊ कसा? त्याच्यासाठी आपण अॅप तयार केलेले आहेत. तसेच जाऊ कसा यासाठी देखील सुविधा केल्या आहेत. पण गेल्यानंतर राहणार कुठे त्या सुविधा कशा असतील? येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी आपण दर्जेदार सुविधा केल्या आहेत. मी तर म्हणेन आपल्याला दुसरा ब्रँड अम्बेसिडर नेमण्याची गरज नाही. येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड अम्बेसिडर असला पाहिजे. कारण ती आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भवं, त्या दृष्टीने जर त्याला सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर तो परदेशात जाऊन सांगेल, अरे तु महाराष्ट्रात जा आणि महाराष्ट्रात गेल्यावर अमूक ठिकाणी जा, तु तिकडे पोहचल्यावर राहण्याची सुविधा देखील उत्तम आहे. या अशा गोष्टींच्या दिशेना आपण प्रवास करत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अर्थमंत्री बोलले म्हणून त्याला अर्थ

उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्री म्हणजे नुसतं उपमुख्यमंत्री म्हणून बोले असता तर अर्थ नसता तर अर्थमंत्र्यांनी बोललंय म्हणून त्याला अर्थ आहे. असे वक्तव्य देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण विभागाला निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला आहे. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य टोला लगावला आहे.

डेक्कन ओडिसीमध्ये कॅबिनेट करणार

असे काही रुट्स डेक्कन ओडिसी (deccan odyssey ) सारखे सुरु करा की आमची येणारी प्रत्येक कॅबिनेट बैठक ही त्या ट्रेनमध्ये करण्यात येईल. परंतु आमच्यावर बंधन येईल की तो प्रवास संपण्याच्या पुर्वी आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण पोहचलो आणि कॅबिनेट संपली नाही तर मोठी पंचायत आहे. आपण आव्हान घेतलं पाहिजे की, डेक्कन ओडिसीमध्ये कॅबिनेट करणार लवकर सुरु करा असे आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. प्रधानसचिव वल्सा नायर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डेक्कन ओडिसीसारखे रुट्स तयार करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : प्रत्येक नागरिकाचा हेल्थ रेकॉर्ड होणार सुरक्षित, मोदींकडून ‘Digital Health Mission’ चा शुभारंभ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -