घरमहाराष्ट्रहोय गद्दारच म्हणणार! बुडाला लागलेली मंत्रिपदं जातील, पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार...

होय गद्दारच म्हणणार! बुडाला लागलेली मंत्रिपदं जातील, पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही; ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी जतेला संबोधित केले.

मुंबई – शिवसेनेमध्ये गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केला. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५० आमदारांवर टीकेचे बाण सोडले.

हेही वाचा – आई-वडिलांची आणि शिवरायांची शपथ घेऊन सांगतो…, युतीवरून ठाकरे शिवाजी पार्कात कडाडले

- Advertisement -

उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, “अनेक वर्षांचा दसरा मेळावा लक्षात आहे, पण असा दसरा मेळावा पहिल्यांदाच पाहिला. हा मेळावा अभूतपूर्व आहे. मी भारावून गेलोय. भाषणासाठी अनेक मुद्दे आहेत. पण किती बोलू शकेन माहित नाही. तुमचं हे प्रेम पाहून शब्द सुचत नाहीयत. हे प्रेम विकत मिळत नाही. हे ओरबाडून नाही घेता येत. ही कोरडी गर्दी नाही. ही अंतकरण असलेल्या माझ्या शिवसैनिकांची गर्दी आहे.”

हेही वाचा सोनिया गांधींच्या पायावर 10 वर्षे लोटांगण घालून मंत्रिपदं भोगली, सुषमा अंधारेंचा राणेंवर घणाघात

- Advertisement -

डॉक्टरांनी मला सांगितलं आहे वाकायचं नाही. पण, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. प्रत्येक वेळेला संकटावेळी संरक्षक कवच मी अनुभवतोय. आई भवानीच्या आशीर्वादाचं जीवंत संरक्षक कवच तुम्ही आहात. शिवसेनेमध्ये गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रिपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. ज्यांनी हे कार्य सोपवलं आहे तो बघून घेईल. शिवतीर्थ बघितल्यावर गद्दारांना कळेला. येथे एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. माता भगिनींना विचारा गावारून पायी चालत आले आहेत. तिकडे एक एकटाचा आहे, पण इथे एकनिष्ठ आहेत. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – नागपूरमधील तीन भ्रष्टाचार प्रकरणं, सुभाष देसाईंनी भर मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांची कुंडलीच मांडली

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -